नैऋत्य खासी हिल्स जिल्हा
नैऋत्य खासी हिल्स जिल्ह्याचे नकाशावरील स्थान
नैऋत्य खासी हिल्स जिल्हा | |
मेघालय राज्यातील जिल्हा | |
मेघालय मधील स्थान | |
देश | भारत |
राज्य | मेघालय |
मुख्यालय | मॉकिर्वत |
क्षेत्रफळ | |
- एकूण | १,३४१ चौरस किमी (५१८ चौ. मैल) |
लोकसंख्या | |
-एकूण | १,१०,४५२ (२०११) |
-साक्षरता दर | ७६% |
प्रशासन | |
-लोकसभा मतदारसंघ | शिलाँग |
-खासदार | व्हिन्सेंट एच. पाला |
संकेतस्थळ |
नैऋत्य खासी हिल्स हा भारताच्या मेघालय राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१२ साली पश्चिम खासी हिल्स जिल्ह्यापासून नैऋत्य खासी हिल्स जिल्हा वेगळा करण्यात आला. नैऋत्य खासी हिल्स जिल्हा मेघालय राज्याच्या दक्षिण भागात स्थित असून त्याच्या दक्षिणेस बांगलादेशचा सिलहट हा विभाग आहे. २०११ साली नैऋत्य खासी हिल्स जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे १.१ लाख इतकी होती. मॉकिर्वत नावाचे नगर नैऋत्य खासी हिल्स जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाच्या असणाऱ्या नैऋत्य खासी हिल्स जिल्ह्यामधील बहुसंख्य रहिवासी खासी जमातीचे असून ख्रिश्चन हा येथील प्रमुख धर्म आहे. खासी ही येथील प्र्मुख भाषा आहे.