नेहरू विज्ञान केंद्र
नेहरू विज्ञान केंद्र (एनएससी) भारतातील सर्वात मोठे परस्परसंवादी विज्ञान केंद्र आहे. ते मुंबईतील वरळी येथे स्थित आहे. केंद्र भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरून ओळखले जाते. १९७७ सालीत 'लाइट ॲण्ड साइट' प्रदर्शनासह हे केंद्र सुरू झाले आणि १९७९ मध्ये तिथे एक सायन्स पार्क तयार करण्यात आला.११ नोव्हेंबर १९८५ रोजी ते तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते जनतेसाठी खुले करण्यात आले.[१][२]
काळानुसार बदल ह्या केंद्रात विज्ञानाच्या विविध संकल्पना सोप्या आणि साध्या सरळ भाषेत समजून घेता येतात.येथे मुलांसाठी विज्ञान उद्यान साकारलेले आहे. केंद्रात शिरताक्षणीच उजव्या बाजूला उद्यान आहे तर डाव्या बाजूला रेल्वेचे वाफेचे इंजिन आहे. पुढे ट्रामचा डबा, हवाई दलाचे विमान आहे. पुढे विविध शास्रज्ञांचे अर्धपुतळे आहेत.१८० अंशातील डोम थिएटरमध्ये विज्ञानपट दाखविला जातो. प्रकाश, ध्वनी, वास, स्पर्श, चव अश्या ज्ञानेंद्रियांशी निगडित अनेक विज्ञान प्रयोग इथे आहेत.
विश्वाच्या उत्पत्ती पासून ते कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंतची प्रदर्शने इथे आहेत. वैज्ञानिक प्रयोग, त्रिमितीय विज्ञान शो, तारांगण, आकाशदर्शन वगैरे कार्यक्रम येथे आयोजित केले जातात.
२८ फेब्रुवारीला येथे राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.