नेव्हा नदी
नेव्हा नदी Peка Нева | |
---|---|
सेंट पीटर्सबर्ग शहरामधील नेव्हाचे पात्र | |
नेव्हा नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | लदोगा सरोवर 59°57′10″N 31°02′10″E / 59.95278°N 31.03611°E |
मुख | फिनलंडचे आखात 59°57′50″N 30°13′20″E / 59.96389°N 30.22222°E |
पाणलोट क्षेत्रामधील देश | रशिया |
लांबी | ७४ किमी (४६ मैल) |
सरासरी प्रवाह | २,५०० घन मी/से (८८,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | २,८१,००० |
नेव्हा (रशियन: Нева) ही वायव्य रशियामधील एक प्रमुख नदी आहे. केवळ ७४ किमी लांबी असलेली ही नदी लेनिनग्राद ओब्लास्तमधील लदोगा सरोवरामध्ये उगम पावते. तेथून पश्चिमेस वाहत जाउन ती सेंट पीटर्सबर्ग शहरामध्ये बाल्टिक समुद्राला मिळते. मालवाहतूकीसाठी ती रशियाच्या महत्त्वाच्या जलमार्गांपैकी एक आहे.
लांबी कमी असली तरी सरासरी जलप्रवाहाच्या बाबतीत नेव्हा युरोपातील वोल्गा व डॅन्यूब खालोखाल तिसऱ्या क्रमांकाची मोठी नदी आहे.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत