नेवासा तालुका
नेवासा तालुका नेवासा | |
---|---|
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | अहमदनगर जिल्हा |
जिल्हा उप-विभाग | श्रीरामपूर |
मुख्यालय | नेवासा |
क्षेत्रफळ | १३४३.४३ कि.मी.² |
लोकसंख्या | ३,२६,६११ (२०११) |
साक्षरता दर | ६३.५९ |
लिंग गुणोत्तर | १०६६ ♂/♀ |
तहसीलदार | श्रीमती हेमलता बढे |
लोकसभा मतदारसंघ | शिर्डी लोकसभा प्रतिंनिधि = भाऊसाहेब वाकचौरे |
विधानसभा मतदारसंघ | नेवासा |
कार्यालयीन संकेतस्थळ |
नेवासा तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्याचा एक तालुका आहे.
या तालुक्याचे ठिकाण, प्रवरा नदीच्या काठावर वसलेले नेवासे हे गाव आहे. याच गावात राहून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि पहिल्यांदा वाचून दाखविली.
नेवासा तालुका २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीपासून स्वतंत्र विधानसभा मतदारसंघ झाला आहे. यापूर्वी नगर-नेवासा आणि नेवासा-शेवगाव अशा दोन मतदार संघांत तालुका विभागलेला होता. राजकीय दृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी या राजकीय पक्षांना अनुकूल असलेला हा तालुका असून अलीकडेच भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीचेही बळ वाढतांना दिसत आहे. मारुतराव घुले , यशवंतराव गडाख, वकीलराव लंघे इत्यादी व्यक्तींमुळे तालुक्याची राज्याच्या राजकारणात ओळख टिकून राहिली आहे. सध्या या सर्वांची पुढची पिढी राजकारणात उतरत आहे .
पूर्वी शेवगाव नेवासा असा संयुक्त मतदार संघ होता , हा तालुका कायम विद्रोही विचाराचा व परिवर्तनवादी तालुका म्हणून ओळखला जातो . पूर्वीं शेवगाव नेवासा असा संयुक्त मतदार संघ असतांना सुद्धा या तालुक्यातील मतदारांनी कधीच शेवगाव तालुक्यातील लोकप्रतिनिधी निवडून दिला नाही , जरी नरेंद्र पाटील घुले हे शेवगावचे असले तरी त्यांच कार्यक्षेत्र हे ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना भेंडा हे असल्या मुळे ते ही याच तालुक्यातील गणले जातात. ह्या तालुक्यातील मतदारांनी यशवंतराव गडाख यांच्या सारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करून वकिलराव लंघे पाटील यांच्या सारख्या कम्युनिस्ट नेत्याला दोन वेळा आमदार केलं . त्याच लंघे पाटलांचा पराभव करत पुन्हा दहा वर्ष काँग्रेसचे संभाजीराव फाटके हे आमदार राहिले , त्यानंतरच्या निवडणुकीत मारुतराव घुले पाटलांसारख्या दिग्गज नेत्याचा पराभव करत तरुण व अपक्ष उमेदवार तुकाराम पाटील गडाख हे आमदार झाले , त्यानंतर तुकाराम गडाख यांचा पराभव करत पांडुरंग अभंग यांच्यासारखे राजकारणात अगदी नवखे व सामान्य व्यक्तिमत्त्व निवडून आले , त्यानंतर जवळपास १५ वर्ष कुठलीही सहकारी संस्था,हाताशी नसतांना वकिलराव लंघे यांचे सुपुत्र विठ्ठलराव लंघे यांनी घुले पाटलांना काट्याची टक्कर या निवडणुकांमध्ये लोक त्यांना वर्गणी करून निधी देत असत , पुढे नेवासा हा स्वतंत्र मतदार संघ झाल्यावर यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव शंकरराव गडाख हे या मतदार संघाचे प्रतिनिधी झाले , विठ्ठलराव लंघे ह्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने तालुक्यातील विरोधक संपला अस चित्र निर्माण झालं असतांना , काँग्रेसचे तात्कालीन तालुका अध्यक्ष बाळासाहेब मुरकुटे हे पुढे आले , त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या जिल्हापरिषद पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस ने २ जिल्हापरिषद गट व २ पंचायत समिती गणात विजय मिळवला, एक गटात अतिशय निसटता पराभव झाला , त्यानंतर मुरकुटे काँग्रेस मधून भारतीय जनता पार्टीत गेले व शंकरराव गडाखांचा पराभव करून ते निवडून आले , हा तालुका कायम परिवर्तनाला साथ देणारा तालुका असून इथला मतदार अतिशय स्वाभिमानी आहे
धार्मिक
नेवासे तालुक्याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे शनी-शिंगणापूर हे धार्मिक स्थळ याच तालुक्यात आहे. या शिवाय देवगड आणि प्रवरासंगम ही स्थानेदेखील प्रसिद्ध आहेत. आणि सध्स्थितीत असेले आमदार बाळसाहेब मुरकुटे हे सुद्धा खूप धार्मिक आहेत म्हणून त्यांना जयहरी असे संबोधले जाते.
नेवासा तालुक्यातील चांदा येथील श्री दत्त साधकाश्रम दत्त मंदिर प्रसिद्ध आहे त्याविषयी -
- श्री दत्त साधकाश्रम चांदा
अहमदनगर जिल्हा हा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा आहे तसेच आध्यात्मिक दृष्ट्यादेखील.. अहमदनगर जिल्ह्यात अनेक देवस्थाने आहेत शिर्डी , शिंगणापूर, मोहता देवी , देवगड नेवासा इ. श्री क्षेत्र नेवासा येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी शके १२१२ मध्ये विश्वाच्या कल्याणासाठी जे पसायदान मागितले ते याच श्री क्षेत्र नेवासा या ठिकाणी.
नेवासा या ठिकाणी गेल्या काही दशकांपासून नवीन देवस्थान उदयास आले आणि ते म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधकाश्रम चांदा. हे देवस्थान श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी आहे . चांदा हे गाव पुणे-औरंगाबाद महामार्गावर घोडेगावपासून पूर्वेकडे ६ किमी तर शनी-शिंगणापूर पासून ११ किमी अंतरावर आहे . शनी शिंगणापूर कडे जाणाऱ्या मार्गाच्या विरुद्ध हे गाव आहे . हे गाव मोठे असून आर्थिक दृष्ट्या व आध्यात्मिक दृष्ट्या परिपूर्ण असे हे गाव आहे. या गावामध्ये पूर्वीपासूनच परमार्थ मोठ्या प्रमाणात घडतो आहे. अनेक थोर संत महापुरुषांचे वास्तव्य या गावात झाले आहे. जुन्या काळी जेव्हा मोगलांचे आक्रमण झाले तेव्हा शिवाजी महाराजसुद्धा या गावात आले होते. आणि आता तर या गावात परमार्थाची लाटच पसरली आहे. आणि ती लाट म्हणजे श्री दत्तधाम श्री दत्त साधाकाश्रम होय. दत्त साधकाश्रमाची सुरुवात श्री संत रोहिदास महाराज यांनी केली. त्यांनी त्यांच्या कठोर तपश्चर्येचे प्रतीक म्हणून हा आश्रम उभारला आहे. रोहिदास महाराज हे मूळचे शेवगाव तालुक्यातील वाघोली गावाचे. परंतु महाराजांचे बालपण चांदा गावामध्ये गेले. त्यांची तपश्चर्याही लहानपणापासूनच सुरू होती. त्यांच्या घराण्याला देखील ईश्वर भक्तीचे वेड होते. महाराजांचे वडील हे भगवान शंकराची भक्ती करत असत. महाराजांनी आळंदी व पंढरपूर या ठिकाणी वारकरी शिक्षण घेतल्यानंतर समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी, समाजाला ईश्वरभक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी आणि आनंद संप्रदायाचा वारसा चालवण्यासाठी, श्री क्षेत्र चांदा या ठिकाणी थांबण्याचे व या ठिकाणाला आध्यात्मिक केंद्र बनवण्याचे ठरवले. आणि मग १९७१ साली नवीन दत्त मंदिराचे काम केले व त्यामध्ये भक्तिभावाने ओवाळून आणलेली दत्त मूर्तीची स्थापना केली. याच दत्त प्रभूंच्या प्रेरणेने महाराजांनी हजारो भक्तांचे जीवनच बदलून टाकले, अनेक व्यसनग्रस्तांना व्यसनमुक्त केले. व अनेकांना भगवंतप्राप्तीचा सोपा मार्ग दाखवला. महाराजांच्या सहवासामध्ये कसाही मनुष्य आला तर त्याच्यामध्ये आध्यात्मिक संचार झाल्याशिवाय राहत नाही.
सृष्टीच्या आरंभी श्री हंस भगवंताने जो उपदेश ब्रम्हदेवाला केला आणि मग ब्रम्हदेवाकडे सृष्टी स्थापन करण्याचे सामर्थ्य आले. तोच उपदेश गुरूपाराम्पारेने महाराजांकडे आलेला आहे . आणि अश्या प्रभावी मार्गाकडे अनेक भक्तांना महाराजांच्या आशीर्वादाने भगवंताचा अनुभव आलेला आहे आणि येत आहे.
दत्त साधकाश्रमाचाच परिसर निसर्गरम्य आहे. या परिसरामध्ये जर मन उद्विग्न झालेली व्यक्ती आली तर येथे प्रवेश केल्या केल्या मनामध्ये आनंदाचा संचार होतो . त्यामुळे एक पर्यटन स्थळ म्हणून भेट देण्यास हा परिसर मस्त आहे
औद्योगिक आणि शैक्षणिक
अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रात साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध आहे. नेवासे तालुक्यात मुळा सहकारी साखर कारखाना, सोनई आणि ज्ञानेश्वर साखर कारखाना हे दोन साखर कारखाने आहेत. या साखर कारखान्यांच्या अनुषंगाने येथे काही शिक्षणसंस्था निघाल्या आहेत व दुग्धव्यवसायाचा विकास झालेला दिसतो आहे. येथील सोनईच्या मुळा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्षपद शंकरराव गडाख यांचेकडे आहे.
मुळा एज्युकेशन सोसायटी ही तालुक्यातील एक उत्तम शिक्षणसंस्था असून या संस्थेमार्फत माध्यमिक, उच्च माध्यमिक, आणि इतर सर्व प्रकारच्या शिक्षणासाठी सोय करण्यात आली आहे. अहमदनगर येथे भरलेल्या ७० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन याच संस्थेने केले होते.
भौगोलिक
नेवासे गाव प्रवरा नदीच्या काठावर वसलेले आहे. या शिवाय गोदावरी आणि मुळा या दोन नद्यासुद्धा या तालुक्यातून वाहतात. या तीन नद्या आणि त्यावरील धणांणातील पाणी यांमुळे या तालुका सुपीक आहे.
बाह्य दुवे
- "नेवासा तालुक्याचा नकाशा". ८ मार्च २०१८ रोजी पाहिले.