नेल्लूर गाय
नेल्लूर गाय-वासरू (ब्राझील) | |
मूळ देश | ब्राझील[१] |
---|---|
आढळस्थान | अर्जेन्टिना, पेराग्वे, व्हेनेझुएला, मध्य अमेरिका, मेक्सिको, उत्तर अमेरिका |
मानक | FAO |
उपयोग | मांसाहार |
वैशिष्ट्य | |
आयुर्मान | १८ ते २० वर्षे |
डोके | मध्यम, निमुळते, छोटे कान |
पाय | लांब, भरीव आणि मजबूत |
शेपटी | लांब, शेपुटगोंडा काळा |
|
नेल्लूर किंवा नेलोर (इंग्रजी:nelore cattle, तेलुगू:నెల్లూరు ఆవు) हा भारतीय गोवंशापासून निर्मित एक ब्राझील देशातील गोवंश आहे. इ.स. १८६८ मध्ये भारतातून ओंगल गोवंश जेव्हा ब्राझीलला पोहोचला, तेथून या गोवंशाचा स्थानिक प्रजातींशी संकर करून, संकर आणि निवड या दोन्ही पद्धतीने सध्याच्या नेल्लूर गोवंशाची निर्मिती केल्या गेली. आज हा ब्राझीलचा सर्वात जास्त प्रमाणात वापरल्या जाणारा मुख्य गोवंश आहे. याचा प्रमुख वापर मांसाहारासाठी केला जातो.[१]
त्याकाळी ओंगल गोवंश हा नेल्लोर प्रांतात मोठ्या प्रमाणात आढळत होता, त्यामुळे या गोवंशाचे नाव नेलोर (इंग्रजीत nelore) असे ठेवण्यात आले. अनेक वर्षांच्या प्रयोगानंतर यात पुढील महत्त्वाचे गुणधर्म उतरले-
- काटक, निरोगी आणि भरल्या अंगाचा गोवंश.
- थंडी वगळता, उष्ण, दमट, कोरडे किंवा इतर प्रतिकूल वातावरणात सहज टिकणारा गोवंश.
- ८ मिलिमीटर पेक्षा अधिक जाड कातडे, त्यामुळे रक्तशोषक किडींना न बाधणारा गोवंश.
- उत्तर पचनक्षमता, त्यामुळे खास विशिष्ट खुराक नाही दिला तरी चालतो.
- उत्तम चविष्ट मांस.
- उत्तम प्रजोत्पादन क्षमता.
- शांत, लाजाळू आणि वात्सल्यपूर्ण स्वभाव.[१][२]
या गोवंशाचा वापर अमेरिकेतील ब्राह्मण गाईच्या निर्मितीत सुद्धा केला गेला.[३] आज ब्राझील मधून हा गोवंश अर्जेन्टिना, पेराग्वे, व्हेनेझुएला, मध्य अमेरिका, मेक्सिको, उत्तर अमेरिका सहित अनेक मांसाहारी देशात निर्यात केला जातो. यामुळे गुझेरात पाठोपाठ हा गोवंश ब्राझीलच्या पशुधनात एक मनाचा गोवंश ठरला आहे.[४]
भारतीय गायीच्या इतर जाती
भारतीय गायीच्या इतर विविध जातींची माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी द्या ― भारतीय गायीच्या विविध जाती
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ a b c "Breeds of Livestock - Nelore Cattle" (इंग्रजी भाषेत). ३० मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ Joshi, N.R.; Phillips, R.W. Zebu Cattle of India and Pakistan, FAO Agriculture Studies No. 19, (इंग्रजी भाषेत). p. १७५. ३० मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Cow production from upgrading Brahman to Nelore and Guzerat" (इंग्रजी भाषेत). ३१ मार्च २०२१ रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ "आंध्र प्रदेश के "ओंगोली सांड" ने ब्राजील में मचाई धूम!" (हिंदी भाषेत).[permanent dead link]
बाह्य दुवे
- Department of Animal Husbandry, Dairying & Fisheries, Government of India, New Delhi
- ICAR-Indian Agricultural Research Institute
- Cattle — Breeds of Livestock, Department of Animal Science
- Zebu Cattle of India and Pakistan. An FAO Study Prepared by N.R. Joshi ... and R.W. Phillips. [With Illustrations.]