Jump to content

नेलमंगला

नेलमंगला हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या बेंगलुरु ग्रामीण जिल्ह्यातील एक शहर आहे. नेलमंगला बेंगलुरु शहराच्या उत्तरेस राष्ट्रीय महामार्ग ७५ ( बंगलोर - मंगळूर ) आणि राष्ट्रीय महामार्ग ४ ( मुंबई - चेन्नई ) या दोन राष्ट्रीय महामार्गांच्या तिठ्याजवळ वसलेले आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३७,२३२ होती. यांपैकी १८,८४० पुरुष आहेत तर १८,३९२ स्त्रीया होत्या. नेलमंगलातील साक्षरता दर ८९.६५% होता. पुरुष साक्षरता सुमारे ९३.२७% तर महिला साक्षरता दर ८५.९७ होता.

२०२० मध्ये दक्षिण-पश्चिम रेल्वेची पहिली रोल ऑन रोल ऑफ वाहतूक सेवा येथून महाराष्ट्रातील बालेपर्यंत सुरू करण्यात आली. तेव्हा ही सेवा भारतीय रेल्वेवरील एकमेव खाजगीरित्या चालणारी रोरो सेवा होती. []

संदर्भ

  1. ^ "karnatakas-first-ro-ro-train-chugs-off-from-nelamangala". The New Indian Express. 2020-09-01 रोजी पाहिले.