नेपाळ महिला क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०२१-२२
नेपाळ महिला क्रिकेट संघाचा कतार दौरा, २०२१-२२ | |||||
कतार महिला | नेपाळ महिला | ||||
तारीख | १६ – १८ नोव्हेंबर २०२१ | ||||
संघनायक | आयशा | रुबिना छेत्री | |||
२०-२० मालिका | |||||
निकाल | नेपाळ महिला संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | आयशा (३७) | सिता राणा मगर (१२१) | |||
सर्वाधिक बळी | अँजेलिन मार (४) | रुबिना छेत्री (६) | |||
मालिकावीर | रुबिना छेत्री (नेपाळ) |
नेपाळ राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी नोव्हेंबर २०२१ दरम्यान कतारचा दौरा केला. दोन्ही संघांची ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती. २०२१ महिला ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक आशिया पात्रता स्पर्धेसाठी नेपाळ संघाचा सराव व्हावा म्हणून ही मालिका आयोजीत केली गेली. सर्व सामने दोहा मधील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान येथे खेळवण्यात आले.
नेपाळने पहिल्या ट्वेंटी२० सामन्यात ११९ धावांनी विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली. पुढील दोन्ही सामन्यांमध्ये विजय मिळवत नेपाळ महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका ३-० ने जिंकली.
महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
नेपाळ १४६/४ (२० षटके) | वि | कतार २७ (११.५ षटके) |
अँजेलिन मार ८ (१३) रुबिना छेत्री ३/१ (१.५ षटके) |
- नाणेफेक : कतार महिला, क्षेत्ररक्षण.
- कतार आणि नेपाळ मधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
- नेपाळ महिलांनी कतारमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
- नेपाळने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये कतारवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
- हिरल अगरवाल, रिझ्फा बानो एमान्युएल, सबीजा पन्यान, केरी पॉनसेट (क), कबिता जोशी आणि संगिता राय (ने) या सर्वांनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
नेपाळ १२९/६ (२० षटके) | वि | कतार ६८ (१९.३ षटके) |
रुबिना छेत्री ५० (४८) अँजेलिन मार २/२८ (४ षटके) | आयशा २४ (३२) सरस्वती कुमारी ४/८ (४ षटके) |
- नाणेफेक : नेपाळ महिला, फलंदाजी.
- ज्योती पांडे आणि शबनम राय (ने) या दोघींनी महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.