नेपानगर
नेपानगर भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील छोटे शहर आहे. येथे इ.स. १९५५मध्ये भारतातील पहिला वृत्तपत्राला लागणारा कागद कारखाना सुरू झाला.
बऱ्हाणपूर जिल्ह्यात असलेले हे गाव मध्य रेल्वेच्या भुसावळ आणि इटारसी या दोन मोठ्या स्थानकांच्या दरम्यान येते. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३१,६५८ होती.