Jump to content

नेत्रदान

नेत्र दान म्हणजे दात्याच्या मृत्यूनंतर त्याचे/ तीचे डोळे दुसऱ्या कोणाला तरी दान करणे. ज्यांचे डोळे कॉर्नियल इन्फेक्शनमुळे ख़राब झाले आहेत त्यांनाच नेत्रदानाचा फायदा होतो. ज्यांचे डोळे ईतर कारणांमुळे खराब झाले आहेत अशा लोकांना नेत्रदानाचा फायदा होत नाही. कुठलाही माणुस नेत्रदान करु शकतो. दात्याला वयाचं बंधन नाही, कुठल्याही वयाचा माणुस नेत्रदान करु शकतो. अशा दात्याची नोंदणी असणे आवश्यक असते. परंतु ज्या व्यक्तिंना एड्स, सिफलिस किंवा रक्ताचे इन्फेक्शन असेल किंवा मृत्यु रेबीजमुळे झाल्यास नेत्रदान करता येत नाही.

नेत्रदान करण्यासाठी जवळच्या आय बँक मध्ये जाउन नोंदणी करणे आवश्यक असते.