नेटकर्यांचे साहित्य संमेलन
दिनांक २५ ते २७ डिसेंबर २०१० या काळात ठाणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले.. त्या संमेलनाचे वैशिष्ट्य म्हणजे संमेलनात असलेला तरुणांचा सहभाग. ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळा कॉलेजांमधील विद्यार्थी आणि तरुण साहित्यिक यांनी हे संमेलन गाजवले.. या संमेलनात एक पूर्ण दिवस युवा साहित्य संमेलन झाले होते. आणि हे संमेलन जोरदार व्हावे यासाठी त्याचीच एक पूर्वतयारी म्हणून ठाणे शहरात दिनांक १४ नोव्हेंबर रोजी एक नेटकऱ्यांचे साहित्य संमेलन झाले.. इंटरनेटवर लिहिणारे कवी, लेखक आणि नेटवरील साहित्याचे वाचक या संमेलनात सामील झाले होते.
पहा : साहित्य संमेलने