नेऊरगाव
?नेऊरगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | येवला |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड | • 423401 • +०२५५९ • एमएच15 |
नेऊरगाव हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथे मार्चच्या मध्यापासून जूनच्या पूर्वार्धापर्यंत उन्हाळा असतो. उन्हाळ्यात हवामान सामान्यतः उष्ण असून तापमान ३७ ते ३९ सेल्सियसपर्यंत असते.जून महिन्याच्या मध्यापासून पावसास सुरुवात होऊन ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत पावसाळा असतो. सर्वसाधारण नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात थंडी असते.वार्षिक सर्वसाधारण हवामान उष्ण व विषम असते.वार्षिक पर्जन्यमान १,००० मि.मी.पर्यंत असते.
लोकजीवन
येथील राहणीमान साधारण पुरुष धोती, पायजमा, नेहरू शर्ट टोपी, आणि स्त्रिया लुगडे, साडी चा पोशाख करतात.
गावात बहुसंख्य मराठा जातीचे लोक राहतात, तसेच विविध धर्मीयसुद्धा एकोप्याने राहतात, गावातील प्रत्येक सन हे मिळूनच साजरे केले जातात.
दरवर्षी दांडी पौर्णिमेला नेवरगाव ची ग्रामदेवता श्री वज्रेश्वरी देवीची यात्रा भरते. नवरात्रोत्सव हा सुद्धा मिळूनच साजरा केला जातो. दरवर्षी मनोरंजनासाठी गावात अखाडी बोहाडा चे सात दिवसांसाठी आयोजन केले जाते. तसेच वांगेसठ या सनापासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते व गावतील प्रत्येक जण आपापल्या परीने हे सर्व पार पाडण्यासाठी प्रयत्न करत असतो व हवी ती मदतही मिळून केली जाते.
प्रेक्षणीय स्थळे
नेऊरगाव मध्ये श्री वज्रेश्वरी देवीचे प्रख्यात मंदिर आहे.
गावाच्या बाहेर भींगारे रोडवर श्री कानिफनाथ महाराजांचे मंदिर आहे.
नागरी सुविधा
नेऊरगावच्या शेजारी जळगाव नेऊर, मुखेड, भिंगारे, एरंडगाव, मानोरी, सातळी, पुरणगाव ही गावे आहेत.