Jump to content

नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी

नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी
पक्षाध्यक्षचिंगवांग कोन्याक
लोकसभेमधील पक्षनेतातोकेहो तेप्थोमी
स्थापना१७ मे २०१७
संस्थापकनेफिउ रिओ
मुख्यालयदिमापूर, नागालँड
युतीराष्ट्रीय लोकशाही आघाडी
लोकसभेमधील जागा
१ / ५४५
राज्यसभेमधील जागा
० / २४५
विधानसभेमधील जागा
२० / ६०
(नागालँड विधानसभा)
राजकीय तत्त्वेप्रादेशिकवाद
संकेतस्थळndpp.co.in

नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी हा भारत देशाच्या नागालँड राज्यामधील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. २०१७ साली नागा पीपल्स फ्रंट पक्षामधील काही बंडखोर सदस्यांनी पक्षामधून वेगळे होऊन नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी नावाच्या पक्षाची स्थापना केली. २०१८ मध्ये विधानसभा निवडणुकीअगोदर नागा पीपल्स फ्रंटचे प्रभावी नेते नेफिउ रिओ ह्यांनी देखील एन.डी.पी.पी. मध्ये प्रवेश केला व भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर केला. २०१८ नागालॅंड विधानसभा निवडणुकीमध्ये ह्या पक्षाला ६० पैकी १८ जागांवर विजय मिळाला व त्याने भाजपच्या पाठिंब्याच्या बळावर सरकार स्थापन केले. नेफिउ रिओ हे नागालॅंडचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

२०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये देखील नागालँड लोकसभा मतदारसंघामधून एन.डी.पी.पी.चा उमेदवार निवडून आला. आजच्या घडीला हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे.

बाह्य दुवे