Jump to content

नृत्य

नृत्य ही आनंदाची नैसर्गिक अभिव्यक्ती आहे.आनंद व्यक्त करणे, दिवसभराच्या श्रमानंतर संध्याकाळी एकत्र येऊन नृत्य गायनाने विरंगुळा आणि मनोरंजन करणे यातूनच लोकनृत्याचा जन्म झाला. नृत्यातून आपण आपली भावना व्यक्त करू शकतो. या नृत्याला पुढे काही नियम लागू झाले.ज्यांनी स्वतः भोवती शास्त्राचं वलय आणि तंत्राची चौकट निर्माण केली त्या नृत्य शैलीला शास्त्रीय नृत्य शैली म्हणून मान्यता मिळाली. नृत्य हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. २९ एप्रिल हा जागतिक नृत्य दिन म्हणून साजरा केला जातो.

फोटोग्राफी, चित्रकला, गायन, वादन, लिखाण यांप्रमाणेच नृत्य, हा छंद केवळ एक आवड म्हणून न जोपासता व्यावसायिक क्षेत्र म्हणूनही निवडता येतो.या क्षेत्रात मध्ये लोकांने भरपूर नाव कमवले आहे व ते सफल सुद्धा झालेल आहे.

पार्श्वभूमी

भारतीय अभिजात कलांमध्ये नृत्य कलेला फार मोठी परंपरा लाभली आहे.भारतीय नृत्य शास्त्राचा प्राचीन ग्रंथ भरत मुनींनी लिहिलेले नाट्यशास्त्र असले तरी प्रत्येक ठिकाणच्या संस्कृती, परंपरा, लोककला, सामाजिकता यांच्या संयोगाने शास्त्रीय नृत्य परंपरेचे वेगवेगळे प्रवाह निर्माण झाले. देव देवतांपासून, पुराण कथेतून तसेच हजारो वर्षापासून स्त्री पुरुषांच्या भावभानांचे कलात्मक प्रकटीकरणाच्या सृजनशीलतेची 'नृत्य' ही शक्ती आहे.

नृत्यात कारकीर्द करू इच्छिणाऱ्याला नृत्याचा इतिहास व व्यावसायिक पार्श्वभूमी माहीत असावी लागते. नृत्य ही ललित कला आहे. नृत्य म्हणजे नाचणे, या धातूवरून नृत्य, नृत, नर्तन इ. शब्द बनले आहेत. या 'नृत्याच्या अनेकांनी अनेक व्याख्या दिल्या आहते. अभिनय दर्पण ग्रंथातील एक व्याख्या नेहमी उद्धृत केली जाते.

रसभाव व्यंजादियुतं नृत्यभितीर्यते।

भारतीय नृत्यशैली

नृत्य ही एक ६४ कलांपैकी असलेली कला आहे. दोनशेहून अधिक लोकनृत्ये ही भारतात प्रचलित आहेत.आठ शास्त्रीय नृत्यशैली भारतात रुजलेल्या आहेत. यातील कथक, मणिपुरी, भरतनाट्यम् सत्रिया आणि कथकली या प्रमुख शास्त्रीय नृत्य पद्धती आहेत, तर कुचिपुडी, ओडिसी, मोहिनीअट्टम या भगिनी शैली आहेत.[]

भरतनाट्यम

  1. ही सर्वात प्राचीन नृत्य शैली असून तिचा उगम तामिळनाडू येथील तंजावूर प्रांतात झाला.
  2. या शैलीवर द्रविड संस्कृतीचा प्रभाव आहे.
  3. यात कर्नाटक संगीत असते.
  4. एकल शैली असून स्त्री किंवा पुरुष दोघेही नाचू शकतात. हल्ली सांघिक रचनाही असतात.
  5. संस्कृत, कन्नड, तेलुगू, तमिळ या भाषांमध्ये नृत्य रचना आढळतात.
  6. वाद्य- मृदंग, घटम, खंजिरा, मोरसिंग, बासरी, व्हायोलीन, तालम आणि वीणा.
  7. दैवत- शिव,विष्णू, मुरुगन, गणेश, देवी.
  8. ग्रंथ- नाट्यशास्त्र, अभिनय दर्पण.
  9. रचना-पुष्पांजली, अलारिपू,जतीस्वरम, कौतुकम, शब्दम, वर्णम, अभिनय पदम, तिल्लाना, मंगलम

कथक

  1. उत्तर भारतात उदयास आलेली शैली.बनारस,जयपूर लखनौ येथे विस्तार.
  2. मोगल संस्कृतीचा प्रभाव
  3. हिंदुस्थानी संगीताचा वापर
  4. एकल शैली असून स्त्री आणि पुरुष दोघेही नृत्य करतात. हल्ली सांघिक रचनाही असतात.
  5. हिंदी, ब्रिज, भोजपुरी,उ र्दू भाषांमध्ये रचना असतात.
  6. वाद्य - बासरी, तबला, पेटी, पखवाज, सारंगी.
  7. दैवत- कृष्ण, शिव.
  8. ग्रंथ - नाट्यशास्त्र, अभिनय दर्पण
  9. रचना - वंदना, सलामी, थाट, परण, अभिनय पक्ष.

कथकली

  1. केरळची वैशिष्ट्यपूर्ण शैली
  2. आर्य आणि द्रविड संस्कृतीचा प्रभाव
  3. कर्नाटक सोपनम संगीत
  4. समूह शैली आणि फक्त पुरुष कलाकार
  5. भाषा -मल्याळम, संस्कृत
  6. वाद्य - चेंगला, मद्दल, चेंडा, एल्लतालम
  7. दैवत - रामायण, महाभारतातील पात्र आणि भास, कालिदासाची नाटके
  8. ग्रंथ- हस्तलक्षण दीपिका
  9. रचना - श्लोक, पदम, कलाझीम

मणिपुरी नृत्य

  1. मणिपूर, आसाम, बंगाल, त्रिपुरा या ईशान्य भारतातील शैली.
  2. वैष्णव संप्रदायाचा प्रभाव.
  3. समूह शैली
  4. भाषा -मणिपुरी
  5. वाद्य - ढोलक, बासुरी, शंख, झांजा, तंबोरा, पुंग
  6. दैवत- कृष्ण
  7. ग्रंथ- गोविंद संगीत, लीला विलास.
  8. रचना - रासलीला

भारतातील राज्यानुसार नृत्यप्रकार

नृत्यासाठी लागणारे पोशाख आणि दागिने

नृत्यशैलींशी संबंधित विशेष पोशाखांची, फुलाच्या गजऱ्यांची व दागिन्यांची आवश्यकता असते. त्यासाठी पुणे-मुंबईत खास दुकाने आहेत. पुण्यातली अशी काही दुकाने:-

  • आभूषा (टिळक रोडजवळील विजयनगर कॉलनी-पुणे, संचालक - सई परांजपे) : स्थापना २९ एप्रिल, २००८. या दुकानात मंचाच्या सुशोभनाचे साहित्य, गाताना मांडीवर घ्यायच्या शाली, झब्बे यांपासून सर्व नृत्य-संगीत वस्त्रसामग्री मिळते.
  • नृत्यभूषा (धायरी-पुणे, संचालक - नीलिमा हिरवे) : या दुकानात भरतनाट्यम, कथक, ओडिसीसह सहा नृत्यशैलींशी संबंधित वस्त्रे मिळतात. त्यांत निळा, लाल, हिरवा यांसह विविध रंगांतील जवळपास १०० घागरे, मोत्याचे आणि सोन्याचे दागिने, त्यातही नेकलेस आणि डूल यांच्यासहित वेल, कंबरपट्टा, गजरे यांचा समावेश आहे.
  • नृत्यारंभ स्टोअर

संदर्भ

[]

  1. ^ भिडे-चापेकर, सुचेता (२००८). नृत्यात्मिका. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन. pp. ४२ ते ५८. ISBN 81-7421-104-14 Check |isbn= value: length (सहाय्य).
  2. ^ http://marathi.webdunia.com/article/career-guidance-marathi/%E0%A4%A8%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%83-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-109033100044_1.htm