नुव्हेल-अॅकितेन
नुव्हेल-अॅकितेन प्रदेशाचे नकाशावरील स्थान
नुव्हेल-अॅकितेन Nouvelle-Aquitaine | |||
फ्रान्सचा प्रदेश | |||
| |||
नुव्हेल-अॅकितेनचे फ्रान्स देशामधील स्थान | |||
देश | फ्रान्स | ||
राजधानी | बोर्दू | ||
क्षेत्रफळ | ८४,०३६ चौ. किमी (३२,४४६ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | ५९,५६,९७८ | ||
घनता | ७१ /चौ. किमी (१८० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-NAQ | ||
संकेतस्थळ | nouvelle-aquitaine.fr |
नुव्हेल-अॅकितेन (फ्रेंच: Nouvelle-Aquitaine उच्चार ; ऑक्सितान: Nòva Aquitània; बास्क: Akitania Berria) हा फ्रान्स देशाच्या १८ प्रदेशांपैकी एक प्रशासकीय प्रदेश आहे. आकाराने फ्रान्समधील सर्वात मोठा असलेला हा प्रदेश फ्रान्सच्या पश्चिम भागात असून त्याच्या पश्चिमेस अटलांटिक महासागर तर दक्षिणेस स्पेन देश आहेत. २०१६ साली अॅकितेन, लिमुझे व पॉयतू-शाराँत हे तीन प्रदेश एकत्रित करून नुव्हेल-अॅकितेन प्रशासकीय प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.
विभाग
नुव्हेल-अॅकितेन प्रशासकीय प्रदेश खालील बारा विभागांमध्ये विभागला गेला आहे.
- शारांत (Charente)
- शारांत-मरितीम (Charente-Maritime)
- द्यू-सेव्र (Deux-Sèvres)
- व्हियेन (Vienne)
- क्रूझ
- ऑत-व्हियेन
- कोरेझ
- दोर्दोन्य
- जिरोंद
- लांदेस
- लोत-एत-गारोन
- पिरेने-अतलांतिक
प्रमुख शहरे
- बोर्दू (1,140,668)
- Bayonne (283,571)
- लिमोज (282,876)
- लिमोज (254 051)
- Pau (240,898)
- La Rochelle (205,822).