नुपूर
नूपुर हा भारतातील व विशेषतः महाराष्ट्रातील स्त्रियांचा पायास बांधण्याचा एक पारंपरिक प्रसिद्ध दागिना आहे. नुपूरलाच चाळ असाही शब्द आहे. हे चाळ साधारणपणे चांदीचे असतात. पायाला सोने लावायची रीत नसल्याने ही कधीही सोन्याचे नसत. पायाला सोने लावायची परवानगी फक्त महाराण्यांना असे. लहान मुली आणि नर्तकी पायात चाळ बांधतात. पण एके काळी गरती स्त्रिया हा अलंकार वापरीत. सीतेच्या पायातही नुपूर होते. अर्वाचीन स्त्रिया पायांत पैंजण बांधतात. पैंजणाची घुंगरे छोटी असतात, ती फारसा आवाज करीत नाहीत. छोट्या रामाच्या पायांतही पैंजण होते. तान्ही मुलेबाळे पायात वाळा बांधतात. गुणवानपि मौखऱ्यात् लुठति लूपुरः | अर्थ – ( सूत्र ) वान् असिनही सतत शब्द करीत राहील्यामुळे नूपुर पायात लोळतो. [१]
स्वरुप
नुपूर हा चौकोनी शिरांचा सोनेरी व चांदीचा वाळा. त्याच्यातून चालतान ध्वनी निघावा म्हनून आत दाने घातलेले असत.
प्रकार
पूर्वी चरणअलंकारचे प्रकार होते.
- पादचूड – रत्नजाडत सुवर्णांचा वाळा.
- पादकंटक – चौकोनी तीन शिरांचा सोनेरी वाळा. यातून ध्वनी निघावा म्हनून आत दाने घातलेले असत.
- पादपध्न – तीन किंवा पाच सोनेरी साखळ्यांचा जडावाचा दागीना.बंगालमध्ये चरणपध्न या नावाने आजही तो प्रचारात आहे. हा चांदीचा केलेला असतो.
- किंकणी – यालाच मराठीत पादकंटक पैंजण असे मह्णतात.
त्यामध्ये नुपूर हा पादकंटक या प्रकारातला होता.
संदर्भ आणि नोंदी
- ^ भारतीय संस्कृती कोष खंड १