Jump to content

नुआखै उत्सव

नुआखै उत्सवात कला सादर करणारे कलाकार

नुआखै उत्सव हा ओरिसा आणि छत्तीसगड राज्यातील कृषी संस्कृतीशी संबंधित सण आहे.[] भातपिकाच्या नव्या हंगामाचे स्वागत या सणाने केले जाते.[] नुआ म्हणजे नवीन/नूतन आणि खै किंवा खाई म्हणजे खाणे. नव्या अन्नधान्याशी संबंधित असे याचे स्वरूप आहे. यालाच भेटगाठ असेही नाव आहे.समता आणि बंधुभाव यांची मूल्ये जपायला शिकविणारा उत्सव म्हणून याकडे पाहिले जाते.

पार्श्वभूमी

पश्चिम ओरिसाच्या संबळपूर भागात या उत्सवाची लोकप्रियता विशेष आहे. या परिसरात प्रामुख्याने आदिवासी बहुल परिस्थिती असल्याने नव्या धान्याशी संबंधित उत्सवाचे महत्त्व आहे. या सणाचे मूळ वैदिक काळापासून असल्याची धारणाही प्रचलित आहे.[] वैदिक काळी केल्या जात असलेल्या प्रलंबन यज्ञ, सीता यज्ञ अशा यज्ञापासून या सणाची कलपणा उदयाला आली असे मानले जाते. पाटणा राज्यात इसवी सनाच्या चौदाव्या शतकात या सणाची सुरुवात झाली असे लोक मानतात.[]

स्वरूप

भाद्रपद महिन्याच्या पंचमी तिथीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुस-या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. अन्नाशी संबंधित असा हा उत्सव झारखंड आणि ओरिसा येथील वैशिष्ट्यपूर्ण उत्सव म्हणून प्रसिद्ध आहे.नव्या पिकाबद्दल शेतक-याच्या मनात आशा निर्माण करणारा असा हा सण आहे. लगन म्हणजे दिवसाच्या एका विशिष्ट वेळेला या सणाची पूजा केली जाते. यात प्रथम ग्रामदेवता किंवा स्थानदेवतेचे पूजन व स्मरण केले जाते. सणाच्या आधी घराची आणि गोठ्याची स्वछता करणे, नव्या कपड्यांची खरेदी करणे, झोटी चीता नावाची वैशिष्ट्यपूर्ण राबगोली अंगणात, दारात आकधने अशी पूर्वतयारी केली जाते. एकमेकांना भेटवस्तू देणे, समूहातील वृद्ध व्यक्तींचे आशीर्वाद घेणे, एकत्रितपणे उत्सवाची मजा घेणे हे सर्व संध्याकाळच्या वेळेला केले जाते.[] पीठा नावाचा गोड पदार्थ यासाठी तयार केला जातो. चकली, मग बारा, खीर यासारखे पदार्थही केले जातात. मटण आणि तत्सम पदार्थ करून त्यांचा नव्या ताज्या भातासह खाण्याचा आनंद घेतला जातो. ढोल, ताशा इत्यादी पारंपरिक वाद्यांच्या तालावर संबळपुरी लोकगीते गात लोकनृत्य केले जाते.[]

संदर्भ

  1. ^ Arora, Sumit (2021-09-14). "Nuakhai Juhar harvest festival celebrated in Odisha". adda247 (इंग्रजी भाषेत). 2022-01-08 रोजी पाहिले.
  2. ^ a b "Nuakhai – The harvest festival of western Odisha". Times of India Blog (इंग्रजी भाषेत). 2021-09-11. 2022-01-08 रोजी पाहिले.
  3. ^ a b "Nuakhai Festival: History, significance, celebration and images". India Today (इंग्रजी भाषेत). 2022-01-09 रोजी पाहिले.
  4. ^ "Nuakhai – The harvest festival of western Odisha". The Times of India Blog (इंग्रजी भाषेत). 2021-09-11. 2022-01-09 रोजी पाहिले.