नीलिमा गुंडी
डॉ. नीलिमा गुंडी या एक मराठीच्या प्राध्यापिका, भाषाभ्यासक, कवयित्री आणि लेखिका आहेत.. पुणे येथील सर परशुरामभाऊ कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागात त्या प्राध्यापक होत्या.
नीलिमा गुंडी या २०११ साली बेळगाव येथे झालेल्या मंथन महिला संमेलनाच्या अध्यक्ष होत्या.
डॉ. नीलिमा गुंडी यांनी लिहिलेली पुस्तके
- अक्षरस्पंदन (लेखसंग्रह)
- अक्षरांचा देव (बालसाहित्य)
- आभाळाचा फळा (बालकविता, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार)
- कविता : विसाव्या शतकाची (सहसंपादक - प्र.ना. परांजपे, शांता शेळके, वसंत आबाजी डहाके)
- कानामात्रा (बालकविता, महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार)
- गतकाळाची गाज (स्त्रीलिखित आत्मकथनांचा सांस्कृतिक अभ्यास )
- चैतन्यवेल (रा.ग. जाधव यांच्यासह संपादन)
- जगण्याच्या कोलाहलात ( कवितासंग्रह )
- दुधाचे दात (बालकविता)
- देठ जगण्याचा (ललित लेखसंग्रह)
- निरागस (बालांसाठी ई अंकाचे संपादन)
- प्रकाशाचे अंग (कवितासंग्रह)
- भारतीय भाषांतील स्त्रीसाहित्याचा मागोवा : खंड १ आणि खंड २ (संपादनात महत्त्वपूर्ण सहभाग) दोनही खंडांचे इंग्रजीत अनुवाद
- भाषाप्रकाश (भाषाविषयक लेख)
- भाषाभान (भाषाविषयक ३३ लेखांचा संग्रह)
- रंगांचा थवा (बालकविता संग्रह)
- लाटांचे मनोगत (स्त्री काव्यसमीक्षा)
- वाऱ्यावर स्वार (बालकथा)
- शब्दांची पहाट (ललित लेख)
- समीक्षेचा रियाज (पुस्तक परीक्षणे)
- स्पर्शरेषा (कवितासंग्रह)
- स्त्रीमिती : निवडक 'मिळून साऱ्याजणी' (संपादन)
- स्त्रीलिपी (स्त्रीसाहित्याची समीक्षा)
- स्त्रीसाहित्याचा मागोवा (खंड ४ : प्रस्तावनालेखन आणि अन्य संपादंकांबरोबर संपादन)
- स्त्रीसंवेद्य (स्त्री साहित्यसमीक्षा)
पुरस्कार
- ‘देठ जगण्याचा’ या पुस्तकाला मसापचा वार्षिक पुरस्कार (२६-५-२०१७)
- 'आभाळाचा फळा' आणि 'कानामात्रा' या बालकवितांच्या पुस्तकांना महाराष्ट्र सरकारचे पुरस्कार