Jump to content

नीलांबरी जोशी

नीलांबरी जोशी या एक मराठी संगणकतज्ज्ञ आणि लेखिका आहेत. बी.एस्‌सी. झालेल्या नीलांबरी यांच्याकडे ओरॅकल या संगणकीय भाषेचे सखोल ज्ञान आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांची १५हून अधिक वर्षांची कारकीर्द आहे. कुवेतमध्ये किंवा अमेरिकेत वास्तव्य असणाऱ्या नीलांबरी जोशी ‘शारदा ग्रुप’च्या प्रोजेक्ट मॅनेजर आहेत.

लेखन

  • अंतर्नाद, अक्षर, मेनका, समाजस्वास्थ्य या मासिकांतून आणि दिव्य मराठी, पुढारी, सकाळ आणि लोकसत्ता या वृत्तपत्रांतून सातत्याने लेखन
  • अरविंद गुप्ता यांच्या http://www.arvindguptatoys.com/ या पुस्तकांच्या वेबसाईटसाठी ‘ॲनाटोल ॲन्ड द कॅट’, ‘जोनाथन लिव्हिंगस्टन सीगल’, ‘थ्री डेज टु सी’, नॉन-व्हॉयलन्ट वे ऑफ अप्‌ब्रिंगिंग’, फायर ऑफ हिरोशिमा’ ‘रॅट्स’, ‘वेब ऑफ लाईफ’, ‘हंप ऑन द नंदीज बॅक’, अशा काही पुस्तकांचा अनुवाद
  • ‘औद्योजक’ मासिकात मॅनेजमेंटविषयक सदरलेखन
  • कॉर्पोरेट कल्लोळ - औद्योगिक मानसशास्त्र
  • गंगाजळ निर्मळ (कादंबरी)
  • जिथे मुलांना पंख फुटतात - पर्यायी शिक्षणावरच्या/ Hands On,' चला करू या' विज्ञानप्रयोगांविषयींच्या पुस्तकांचा अनुवाद
  • ‘झपूर्झा भाग १, २, ३’ या विदेशी साहित्यिकांवरच्या पुस्तकांचे अच्युत गोडबोले यांच्याबरोबर सहलेखन
  • अमेरिकेतल्या मॅसॅच्युसेट्‌स संस्थानामधील सडबरी व्हॅली स्कूलच्या अभ्यासक्रमातील ‘फ्री ॲट लास्ट’ या ऑल्टरनेटिव्ह एज्युकेशनविषयक पुस्तकाचा अनुवाद
  • मनकल्लोळ भाग १ व २ (अच्युत गोडबोले यांच्याबरोबर सहलेखन)
  • ‘मनकल्लोळ’ या पुस्तकाचे ॲाडियोबुक
  • मारी क्यूरी, हेनरी डेव्हिड थोरो, रिचर्ड बाच यांनी लिहिलेल्या ५० इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद
  • ‘साप्ताहिक सकाळ’मध्ये विविध विषयांवर सदरलेखन
  • ‘लाईमलाईट : विदेशी चित्रपटसृष्टीची अनोखी यात्रा...!’ या पुस्तकाचे अच्युत गोडबोले यांच्याबरोबर सहलेखन

व्याख्याने

  • करियरच्या वेगळ्या वाट
  • कामाच्या ठिकाणचे ताणतणाव
  • कृत्रिम बुद्धिमत्ता - भवितव्य
  • टीमवर्क
  • नैराश्य/ स्कीझोफ्रेनिया/ अल्झायमर यांच्यासारखे मनोविकार आणि इंग्रजी साहित्य
  • पालक/ मुलांचा हरवलेला संवाद
  • मनोविकार आणि इंग्रजी चित्रपट
  • सोशल मीडिया आणि नात्यांवर होणारे परिणाम

पुरस्कार

  • ‘मनकल्लोळ भाग १ व २’ या पुस्तकाला मसापचा पुरस्कार (२६-५-२०१७)
  • ‘चैतन्य मेंटल हेल्थ फाऊंडेशन’, पुणे यांचा मानसशास्त्रातल्या सामाजिक कामासाठी ‘स्वयंसिद्धा २०१८’ पुरस्कार

इतर

‘माइंड जिम’या मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या संस्थेच्या संस्थापक सदस्य

(अपूर्ण)