नीलम कोठारी
नीलम कोठारी सोनी | |
जन्म | ९ नोव्हेंबर, १९६९ हाँगकाँग |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनेत्री |
कारकीर्दीचा काळ | १९८४ - २००१, २०२० - आजतागायत |
भाषा | गुजराती |
वडील | शिशिर कोठारी |
आई | परवीन कोठारी |
पती | ऋषी सेठीया (ल. २०००, घ.) समीर सोनी (ल. २०११) |
अपत्ये | अहाना |
धर्म | हिंदू |
नीलम कोठारी सोनी किंवा नीलम ह्या एक भारतीय अभिनेत्री आणि मुंबई मधील एक ज्वेलरी डिझायनर आहेत. नीलम ने नवोदित अभिनेता करण शाह सह इस १९८४ साली जवानी या हिंदी चित्रपटातून पदार्पण केले. त्यानंतर, गोविंदा सोबत जोडी जमवून लव्ह 86 (१९८६), इलझाम (१९८६), सिंदूर (१९८६), खुदगर्ज (१९८७), हात्या (१९८८), फर्ज की जंग (१९८९), ताकतवार (१९८९) आणि दो कैदी (१९८९)यांसारख्या विविध चित्रपटांमध्ये काम केले. तर, आग ही आग (१९८७), पाप की दुनिया (१९८८), खतरों के खिलाडी (१९८८), बिल्लू बादशाह (१९८९), घर का चिराग (१९८९), आणि मिट्टी और सोना (१९८९) या चित्रपटांमध्ये चंकी पांडे सोबत काम केले.
प्रारंभिक जीवन
नीलम यांचा जन्म हाँगकाँगमध्ये गुजराती वडील शिशिर कोठारी आणि इराणी आई परवीन कोठारी यांच्या पोटी झाला.[१][२][३][४] लहानपणी नीलम ने कीबोर्ड वाजवणे आणि जॅझ बॅले नृत्य इत्यादी मध्ये आपले कलागुण दाखवले. कोठारी कुटुंबाचा पारंपारिक दागिने बनवण्याचा व्यवसाय असुन ते उच्च दर्जाचे दागिने बनवतात. नीलम यांचे शिक्षण आयलँड स्कूलमध्ये झाले. बालपण हाँगकाँगमध्ये घालवून नंतर त्या कुटुंबासह कुटुंब बँकॉकला गेल्या. नीलम मुंबई येथे आपली सुट्टी घालवत असताना त्यांना दिग्दर्शक रमेश बहल यांनी संपर्क केला.[५] चित्रपट अभिनयात एक प्रयत्न करण्याचे ठरवून त्यांनी नवोदित अभिनेता करण शाहसोबत 'जवानी' (१९८४) चित्रपटात काम केले.[६] पण हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अयशस्वी ठरला.[६]
कारकीर्द
अभिनय
नीलम यांच्या या पहिल्या चित्रपटातील अभिनयाची चित्रपट वर्तुळात दखल घेतली गेली आणि त्यांना अजून काही ऑफर मिळाल्या. नंतर १९८६ मध्ये तत्कालीन नवोदित अभिनेता, गोविंदा सोबत इलझाम चित्रपटात काम केल्या नंतर त्यांना चांगली प्रसिद्ध मिळाली. यानंतर त्यांनी गोविंदासोबत लोकप्रिय जोडी बनवत अजून १४ चित्रपटांमध्ये काम केले. यात लव्ह 86 (१९८६), खुदगर्ज (१९८७), हत्या (१९८८) आणि ताकतवर (१९८९) या चित्रपटांचा समावेश आहे. नंतर त्यांनी चंकी पांडेसोबत ८ चित्रपटांपैकी आग ही आग (१९८७), पाप की दुनिया (१९८८), खतरों के खिलाडी (१९८८), मिट्टी और सोना (१९८९) आणि घर का चिराग (१९८९) यांसारखे ५ हिट चित्रपट दिले होते. तर ३ चित्रपट जखम (1989 चित्रपट), खुले-आम आणि एक बंगाली चित्रपट, मंदिरा (चित्रपट) हे फ्लॉप झाले. नंतर आणखी एक बंगाली चित्रपट बदनाम (१९९०) मध्ये प्रोसेनजीत चॅटर्जी सोबत त्यांनी काम केले.
१९९८ मध्ये शाहरुख खान आणि काजल अभिनित कुछ कुछ होता है या चित्रपटात पाहुण्या भूमिकेसाठी देखील तिची दखल घेण्यात आली होती. तर १९९९ मधील कौटुंबिक चित्रपट हम साथ साथ है मध्ये त्यांनी अजून एक सहाय्यक भूमिका केली होती. नीलम चा शेवटचा चित्रपट कसम (२००१) चंकी पांडेच्या सह विलंबित रिलीज झाला. [७]
२०२० साली, तिने महीप कपूर, भावना पांडे आणि सीमा सजदेह सोबत रियलिटी दूरचित्रवाणी मालिका फॅब्युलस लाइव्ह ऑफ बॉलीवूड वाइव्हज तसेच सीझन 2 (2022) मध्ये काम केले, जे दो.्या नेटफ्लिमालिका क्सवर प्रवाहित केले गेझाल्या[८] [९]
ज्वेलरी डिझायनिंग
अभिनयात कारकीर्द करत असतानाही त्यांनी दागिने निर्मिती मध्ये देखील रस घेत आपल्या कौटुंबिक व्यवसायात काम केले. नीलम यांनी मुंबईत ज्वेलरी-डिझाइनिंग [१०] मध्ये औपचारिक अभ्यासक्रम पूर्ण केला आणि २००१ मध्ये चित्रपटात तात्पुरती रजा घेऊन, नीलम ज्वेल्स या नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. इस. २००४ साली त्यांनी मुंबईत एक दागिन्यांचे शोरूम उघडले [११] त्यानंतर त्यांनी २५ ऑगस्ट २०११ रोजी मुंबईत नीलम कोठारी फाइन ज्वेल्स नावाने एक स्वतंत्र दागिन्यांचे दुकान सुरू केले.
वैयक्तिक जीवन
ऑक्टोबर २००० मध्ये, नीलमने यूकेमधील एक व्यावसायिकाचा मुलगा ऋषी सेठियाशी लग्न केले.[१२] अल्पावधीतच त्यांचा घटस्फोट झाला.[१३] अभिनेता समीर सोनी सोबत काही काळ घालवल्या नंतर[१४] त्यांनी २०११ मध्ये लग्न केले.[१५] लग्नाच्या २ वर्षानंतर २०१३ मध्ये त्यांनी एक मुलगी, 'अहाना' दत्तक घेतली.[१६]
१९९८ मध्ये, सहकलाकार सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे आणि तब्बू यांच्यासह नीलमवर हम साथ साथ है च्या चित्रीकरणादरम्यान कांकणी येथे दोन काळवीटांची शिकार केल्याबद्दल वन्यजीव कायदा आणि आयपीसीचा आरोप ठेवण्यात आला होता. ५ एप्रिल २०१८ रोजी जोधपूर येथील CJM न्यायालयाने यातून नीलामची निर्दोष मुक्तता केली.[१७]
चित्रपट सूची
वर्ष | चित्रपट | भूमिका | सूचना |
---|---|---|---|
१९८४ | जवानी | सनम | |
१९८६ | इलझाम | आरती | |
अंदाज प्यार का | |||
लव्ह 86 | ईशा | ||
१९८७ | आग ही आग | आरती | |
खुदगर्झ | ज्योती | ||
सिंदूर | ललिता कपूर | ||
१९८८ | ताकतवर | बिजली | |
हत्या | सपना | ||
वक्त की आवाज | नर्तकी | ||
घर में राम गली में शाम | जया | ||
खतरों के खिलाडी | सुनीता | ||
पाप की दुनिया | आरती | ||
१९८९ | घराना | ललिता | |
दो कैदी | नीलू | ||
घर का चिराग | किरण | ||
हम भी इंसान है | रेखा | ||
मिट्टी और सोना | अनुपमा | ||
१९९० | विष्णू देवा | ||
मंदिरा | बंगाली चित्रपट | ||
बदनाम | काजोल | बंगाली चित्रपट | |
शंकरा | सीमा | ||
दूध का कर्ज | रेशमा | ||
उपकार दुधाचे | रेशमा | मराठी चित्रपट | |
चोर पे मोर | रितू | ||
अमिरी गरिबी | ज्योती | ||
अग्निपथ | शिक्षा चव्हाण | ||
जखम | आरती | ||
बिल्लू बादशाह | ज्योती | ||
फर्ज की जंग | कविता | ||
दोस्त गरिबो का | रेखा | ||
१९९१ | कसक | दिव्या | |
मीत मेरे मन का | |||
रणभूमी | नीलम | ||
इंद्रजित | नीलम | ||
अफसाना प्यार का | निकिता | ||
१९९२ | एक लडका एक लडकी | रेणू | |
खुले-आम | प्रिया | ||
साहेबजादे | चिनार | ||
लाट साब | अंजू, मोना | ||
१९९३ | परंपरा | सपना | |
१९९५ | संतान | आशा | |
अंतिम न्याय | रेखा | ||
१९९६ | एक था राजा | शिल्पा | |
सौदा | ज्योती | ||
आदित्य | कन्नड चित्रपट | ||
१९९७ | मोहब्बत और जंग | प्रिया | |
१९९८ | कुछ कुछ होता है | निलम | पाहुणे कलाकार |
१९९९ | हम साथ साथ हैं | संगिता | |
२००० | पत्थर और पायल | ||
२००१ | कसम | बिंदिया | |
२०२० | फॅब्युलस लाईव्स ऑफ बॉलिवूड वाईव्ज | स्वतः | वास्तव प्रदर्शनि |
संदर्भ
- ^ "Neelam Interview 1987" – YouTube द्वारे.
- ^ "This Fabulous Mother of Throwbacks, Shared by Neelam Kothari".
- ^ "Neelam Kothari's father passes away: 'You were my guiding light, my strength'". 14 November 2021.
- ^ Tahseen, Ismat (10 January 2011). "Neelam Kothari and Samir Soni get candid about their upcoming wedding". Daily News and Analysis.
- ^ "NRI beauties making it big in Bollywood". window2india.com. 18 January 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 December 2008 रोजी पाहिले.
- ^ a b "Screen the Business of Entertainment-Films-Cover Story". 22 October 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 29 June 2010 रोजी पाहिले.
- ^ "We had loads to sort out before marriage: Neelam". The Times of India.
- ^ "Fabulous Lives of Bollywood Wives review: All bark no bite, this desi Netflix show fails to get even trash TV right". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 28 November 2020. 5 March 2021 रोजी पाहिले.
- ^ Bureau, ABP News (3 March 2021). "'Fabulous Lives of Bollywood Wives' To Return With Second Season On Netflix, Fans Wish To See SRK-Gauri Again On Show". ABP Live (इंग्रजी भाषेत). 5 March 2021 रोजी पाहिले.
- ^ "Top 15 Jewellery Designers In India You Must Know". Jewellery Craze (इंग्रजी भाषेत). 11 July 2017. 2021-06-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 December 2018 रोजी पाहिले.
- ^ "Spotlight - Neelam Jewels". verveonline.com. 1 March 2009 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ Vetticad, Anna M M (6 November 2000). "Actor Neelam Kothari and beau Rishi Sethia get married in Bangkok". India Today (इंग्रजी भाषेत). 17 May 2018 रोजी पाहिले.
- ^ "Neelam Kothari splits with beau". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 6 November 2009. 17 May 2018 रोजी पाहिले.
- ^ Khera, Japleen (26 November 2020). "Neelam Kothari and Samir Soni: Marriage, Family, Kids, How Did They Meet?". The Cinemaholic (इंग्रजी भाषेत). 2 April 2021 रोजी पाहिले.
- ^ "Samir Soni weds Neelam". Rediff. 24 January 2011.
- ^ Maheshwri, Neha (2 September 2013). "Neelam and Samir Soni adopt a baby girl". The Times of India. 17 April 2016 रोजी पाहिले.
- ^ "Blackbuck case: Jodhpur HC adjourns hearing against Saif, Sonali, Tabu, Neelam after issuing fresh notice in May". The Economic Times.
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील नीलम कोठारी चे पान (इंग्लिश मजकूर)