नीलगिरी फुलटोचा
नीलगिरी फुलटोचा (इंग्लिश:Nilgiri Flowerpecker) हा पक्षी लहान, साध्या रंगाचा फुलटोचा आहे.
वरील भागाचा रंग तपकिरी असतो व खालील भागाचा रंग पिवळट पांढरा आणि चोच काळी असते.
वितरण
हे पक्षी भारतात महाबळेश्वरपासून पश्चिम व दक्षिण कर्नाटक, केरळ व पच्छिम तामिळनाडू तसेच पूर्वेकडे शेवरॉय डोंगरमाळा या ठिकाणी आढळतात.
निवासस्थाने
हे पक्षी पानगळीची जंगले आणि सदाहरितपर्णी वृक्षांची वने या ठिकाणी राहतात. रायांतील झाडांवरील बांडगुळावर आढळून येतात.
संदर्भ
- पक्षीकोश - मारुती चितमपल्ली