निशा परुळेकर
निशा परुळेकर | |
---|---|
जन्म | १९ सप्टेंबर, १९७४ कांदीवली, मुंबई, महाराष्ट्र |
ख्याती | अभिनय, राजकारण |
जोडीदार | सुरेश बगेंरा |
अपत्ये | मयुरी |
निशा परुळेकर (१९ सप्टेंबर, १९७४: कांदिवली, मुंबई, महाराष्ट्र - ) या एक मराठी चित्रपट अभिनेत्री आहेत.
त्यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांचा जन्म १९ सप्टेंबर १९७४ रोजी मुंबई येथे झाला होता. त्यांनी एएफएसी इंग्लिश स्कूलमधून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्या चेंबूरमधील स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकल्या. त्या अभियांत्रिकीच्या पदवीधर आहेत.[१] इ.स. २०११ मध्ये रमाबाई भिमराव आंबेडकर चित्रपटात त्यांनी रमाबाई आंबेडकरांची भूमिका साकारली आहे.
चित्रपट
- रमाबाई भिमराव आंबेडकर (चित्रपट) (२०११)
- बाबो (२०१९)
- पारख नात्यांची (२०१८)
- चालुद्या तुमचं
- प्रेमाचे नाते