निवडुंग
हा लेख निवडुंग नावाचे झुडुप याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, निवडुंग (चित्रपट).
निवडुंग (इंग्रजी:कॅक्टस) हा एक वाळवंटी प्रदेशात सापडणारा वनस्पतींचा प्रकार आहे. निवडुंग हे अमेरिका खंडातले झाड आहे. वनस्पतीच्या आतील पाण्याचे बाष्पीभवन कमीत कमी व्हावे अशी या वनस्पतींची वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना असते. त्यामुळे कोरड्या किंवा उष्ण वातावरणात जिवंत राहण्याची त्यांची क्षमता वाढते.
निवडुंगाचे अनेक प्रकार अस्तित्वात आहेत. जसे, डचमन्स पाईप कॅक्टस सगवारो कॅक्टस, अस्वल कॅक्टस, पिंप कॅक्टस, इ. काही निवडुंग खूप उंच वाढतात. उदा. सगवारो कॅक्टस हा ५० फुट पर्यंत उंच वाढतो व २०० वर्ष जगतो, तर काही निवडुंग आपल्या बोटाच्या इतके छोटे असतात. कॅक्टसची सगळी अंगरचना ही पाणी साठवण्यासाठी असते. कॅक्टस वेगवेगळ्या आकाराचे असतात.