Jump to content

निळ्या छातीची पाणकोंबडी

निळ्या छातीची पाणकोंबडी

निळ्या छातीची पाणकोंबडी या पक्ष्याला इंग्रजी मध्ये Slaty-breasted (Blue-breasted) Rail तसेच हिंदी मध्ये कबरी मुर्गी असे म्हणतात.

ओळखण

याचा आकार गावतित्तिरापेक्षा लहान असतो. याची चोच लांबट, डोके आणि मानेमागचा रंग काळसर लाल, पंखांवर पांढरे पट्टे आणि ठिपके, उदी निळ्या रंगाची छाती असते.

वितरण

ते स्थायिक पक्षी आहेत. ते स्थानिक संचार करतात. भारत, श्रीलंका व पूर्व पाकिस्तान, बांगला देश या प्रदेशात ते दिसून येतात. जून ते सप्टेंबर-ऑक्टोबर या काळात त्यांची वीण असते.

निवासस्थाने

ते पठार प्रदेशातील बोरुच्या दलदली, खाजणी आणि भातशेतीचा प्रदेश अश्या ठिकाणी वास्तव्य करतात.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली