Jump to content

निळोबा

संत निळोबा हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत होते. ते अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेराचे होते. संत चरित्रकार महीपती यांनी निळोबांविषयी भक्तिविजयाच्या ५९व्या अध्यायात विवेचन केलं असून त्यांच्या विषयीच्या काही आख्यायिकाही सांगितल्या आहे. त्यांचा काळ इ.स.च्या १७ व्या शतकाचा पूर्वार्ध असावा. ते शा.श. १५८० (इ.स. १६५८) सालाच्या सुमारास विद्यमान होते[].ते प्रतिवर्षी नाथषष्ठीला पैठणच्या वारीस येत. त्यांनी तुकारामांना गुरुस्थानी मानले होते.

त्यांनी तुकारामांविषयी ३३२ श्लोक लिहिले. त्यांच्या अभंगरचनांची संख्या सुमारे १९०० असावी.

निळोबारायांवरची पुस्तके

  • झाला निळा पावन (कादंबरिका, लेखक - अशोक देशपांडे)
  • श्री निळोबाराय महाराज (रा.बा. परदेशी, स.प्र. देसाई)

बाह्य दुवे

  1. ^ महाराष्ट्रभाषाभूषण ज.र.आजगावकर