Jump to content

निळू फुले

निळू फुले
निळू फुले
जन्मनीळकंठ कृष्णाजी फुले.
४ एप्रिल १९३० (1930-04-04)
मृत्यू १३ जुलै, २००९ (वय ७९)
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रअभिनय
भाषामराठी
प्रमुख नाटकेसखाराम बाईंडर
प्रमुख चित्रपट सामना , पिंजरा
पुरस्कारसंगीत नाटक अकादमी
वडील कृष्णाजी फुले
आई सोनाबाई कृष्णाजी फुले
पत्नी रजनी फुले
अपत्ये गार्गी फुले थत्ते (कन्या)

निळू फुले (४ एप्रिल, १९३० - जुलै १३, २००९) हे मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते. कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्याद्वारे पदार्पण केले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोबत काम केलेले आहे.

जीवन

निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणाऱ्या पैशावर चरितार्थ चालवत असत. निळू फुलेंनी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेतले. पण, आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः 'येरा गबाळ्याचे काम नोहे' हा वग लिहिला. त्यानंतर पु. ल.. देशपांडे यांच्या नाटकात 'रोंगे'ची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खऱ्या अर्थाने पुढे आले.

नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणाऱ्या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला.

नाट्य रसिक आणि सिने प्रेमींना कलाकार म्हणून अत्यंत प्रिय असलेले निळू भाऊ समाजवादी विचारधारेशी जोडलेले होते. निळूभाऊंनी राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केलेली आहे. ते समाजवादी विचारवंत नेते डॉ राम मनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रेरित होते. मुळातच नास्तिक[] असलेल्या फुलेंनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेसाठी अंधश्रद्धा विरोधी प्रबोधन, सत्याग्रह, आंदोलनात सक्रीय सहभाग दिला आहे. स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्या नंतरही पिढी घडविणारी राष्ट्रीय संघटना असलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या कला पथकाचे सदस्य राहिलेले निळू फुले यांनी १९५८च्या सुमारास पुण्यातील कला पथकाचे नेतृत्व केले . []

निळू फुले यांचे जुलै १३, २००९ रोजी पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले. अन्ननलिकेच्या कर्करोगाने अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.[]

कारकीर्द

निळू फुले यांनी 'कथा अकलेच्या कांद्याची' या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण केले. 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, आणि सलग ४० वर्षे या चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर कारकीर्द केली. निळू फुले यांनी १२ हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, तर मराठी भाषेतल्या जवळपास १४० चित्रपटांमधून काम केले आहे. त्यांच्या भूमिकांपैकी 'चोरीचा मामला', 'पुढचं पाऊल', 'शापित', 'सामना', 'सिंहासन' यांतील भूमिका विशेष गाजल्या.

गाजलेली लोकनाट्ये

कथा अकलेच्या कांद्याची, कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची, वगैरे.

गाजलेले मराठी चित्रपट

अजब तुझे सरकार

आई (नवीन)

आई उदे गं अंबाबाई

आघात

आयत्या बिळावर नागोबा

एक गाव बारा भानगडी

एक रात्र मंतरलेली

एक होता विदुषक

कडकलक्ष्मी

कळत नकळत

गणानं घुंगरू हरवलं

गल्ली ते दिल्ली

चटक चांदणी

चांडाळ चौकडी

चोरीचा मामला

जगावेगळी प्रेमकहाणी

जन्मठेप

जिद्द

जैत रे जैत

दिसतं तसं नसतं

दीड शहाणे

धरतीची लेकरं

नणंद भावजय

नाव मोठं लक्षण खोटं

पटली रे पटली

पदराच्या सावलीत

पायगुण

पिंजरा

पुत्रवती

पैज

पैजेचा विडा

प्रतिकार

फटाकडी

बन्याबापू

बायको असावी अशी

बिन कामाचा नवरा

भन्नाट भानू

भालू

भिंगरी

भुजंग

मानसा परीस मेंढरं बरी

मालमसाला

मुक्काम पोस्ट ढेबेवाडी

राघुमैना

राणीने डाव जिंकला

रानपाखरं

रावसाहेब

रिक्षावाली

लाखात अशी देखणी

लाथ मारीन तिथं पाणी

वरात

शापित

सतीची पुण्याई

सर्वसाक्षी

सवत

सहकारसम्राट

सामना

सासुरवाशीण

सोबती

सोयरीक

सिंहासन

सेनानी साने गुरुजी

सोंगाड्या

हर्या नाऱ्या जिंदाबाद

हळदी कुंकू

हीच खरी दौलत

थापाड्या .

गाजलेले हिंदी चित्रपट

कूली, जरा सी जिंदगी, दिशा, दुनिया, नरम गरम, प्रेम प्रतिज्ञा, मशाल, सारांश, सौ दिन सास के

गाजलेली नाटकं

जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे, सखाराम बाईंडर, सूर्यास्त.

पुरस्कार

  • महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग ३ वर्षे - इ.स. १९७२, इ.स. १९७३ आणि इ.स. १९७४ मध्ये पुरस्कार मिळाले आहेत.
  • राष्ट्रपतींच्या हस्ते साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार (१९९१)
  • 'सूर्यास्त' या नाटकाकरिता नाट्यदर्पण हा पुरस्कार
  • जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार (२००८)

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ "समृद्ध करणारं संचित". दैनिक लोकसत्ता. ८ मार्च २०२४ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ "महाराष्ट्र टाईम्स". 2009-07-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-07-13 रोजी पाहिले.
  3. ^ "रागावलेल्या महिलेनं भररस्त्यात निळू फुलेंवर केली होती शिवीगाळ, तरीही शांत होते अभिनेते, वाचा हा किस्सा". दैनिक लोकमत. ८ मार्च २०२४ रोजी पाहिले.