Jump to content

निळू दामले

निळू दामले
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य, पत्रकारिता
भाषामराठी
साहित्य प्रकार वृत्तपत्रीय लेखन

निळू दामले हे मराठी भाषेतील एक लेखक, पत्रकार तसेच आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक आहेत. त्यांनी अफगाणिस्तानी तसेच भारतीय मुसलमानांबद्दल लिहिले आहे.

परिचय

निळू दामले यांनी १९६८ पासून मराठीत लिहायला सुरुवात केली. अनंतराव भालेराव ह्यांच्या मराठवाडा दैनिकातून आणि श्री ग माजगावकर यांच्या साप्ताहिक 'माणूस'मधून निळू दामले ह्यांच्या पत्रकारितेचा प्रारंभ झाला. त्यांनी काही काळ मुंबईत कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस ह्यांचे सचिव म्हणून काम केले. अशोक शहाणे यांच्या सोबतीने दामले यांनी दिनांक ह्या साप्ताहिकाचे संपादन केले. त्याबरोबरच दामले ह्यांनी माणूस, महाराष्ट्र टाइम्स, लोकप्रभा, किर्लोस्कर, मनोहर अशा नियतकालिकांतून लिखाण केले आहे.[] मराठी नियतकालिकांसोबतच त्यांनी धर्मयुग, दिनमान ह्यांसारख्या हिंदी नियतकालिकातही लेखन केले. महाराष्ट्रातल्या विद्यापीठांतून त्यांनी पत्रकारिता आणि संवाद या विषयांवर अभ्यागत प्राध्यापक म्हणून अध्यापन केले आहे.

विज्ञान परिषद पत्रिका, महानगर इत्यादी नियतकालिकांचे ते संपादक होते. .

निळू दामले यांनी लिहिलेली पुस्तके

  • पारध
  • Islands of development
  • अवघड अफगाणिस्तान
  • इस्तंबूल ते कैरो : लेखकाच्या दृष्टीतून इस्लामची दोन रुपं
  • उस्मानाबादची साखर आणि जगाची व्यापारपेठ
  • ओसामा : त्याचा इस्लाम, त्याचा कायदा
  • जेरुसलेम : इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्ष
  • टेक्नियम : उद्याच्या बदलाचा वेध
  • टेलेवर्तन
  • दुष्काळ - सुकाळ : जत, चीन, दक्षिण कोरिया, इथियोपिया
  • धर्मवादळ : धर्मात वादळ, वादळात धर्म
  • पाकिस्तानची घसरण
  • पुन्हा एकदा अवघड अफगाणिस्तान
  • बदलता अमेरिकन
  • बाँबस्फोटानंतर... मालेगाव
  • माणूस आणि झाड
  • लंडन बॉम्बिंग २००५
  • लवासा
  • सकस आणि सखोल. जगभरातले नामांकित पेपर, संपादक, पत्रकार
  • सीरिया - सगळे विरुद्ध सगळे
  • culture of inequality
  • सूसाट जॉर्ज. जॉर्ज फर्नांडिस यांचं प्रोफाईल.
  • साधार आणि सडेतोड. जगभरातले नामांकित पत्रकार.

माहितीपट

निळू दामले यांनी मुंबईतील डेढ गल्ली येथे पहाटे चार वाजता भरणाऱ्या चप्पल आणि बुटांच्या बाजाराविषयी डेढ (दीड) गल्ली हा माहितीपट तयार केला आहे.[] याशिवाय त्यांनी गणेश-विसर्जन, शीला चिटणीस यांची झुंज, लक्ष्मीज् स्टोरी असे विविध माहितीपटही बनवले आहेत..[]

पुरस्कार

संदर्भनोंदी

संदर्भसूची

  • "निळू दामले". रोजी मूळ पानापासून संग्रहित2017-02-22. २४-११-२०१७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: BOT: original-url status unknown (link)


  • "निळू दामले". रोजी मूळ पानापासून संग्रहित2017-02-22. २४-११-२०१७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: BOT: original-url status unknown (link)
  • "निळू दामले ह्यांची यूट्यूब-वाहिनी". १९-०७-२०१० रोजी मूळ पान पासून संग्रहित. २४-११-२०१७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक=, |विदा दिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे