निलेश शेळके
'नीलेश केदारी शेळके (२० जानेवारी, १९८२) मराठी कवी, इतिहासाचे अभ्यासक आहेत.
शेळके यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील विरळी हे होय. त्यांनी महाविद्यालयात असल्यापासून कवितालेखन केले आहे. सुरुवातीच्या काळात त्यांनी दैनिके व नियतकालिकांतून कथा लेखन केले. हे कोल्हापूर जिल्हातील गडहिंग्लज येथील डॉ. घाळी कॉलेज मध्ये मराठीचे अध्यापन करतात
प्रकाशित साहित्य
१. अकुतोभय (कवितासंग्रह), शब्दालय प्रकाशन, श्रीरामपूर, ऑगस्ट २०१५
२. होळकरांची थैली (संपादन) अक्षरवेध प्रकाशन, गडहिंग्लज, ऑक्टोबर २०१५
३. समकालीन मराठी साहित्यः स्वरूप आणि समीक्षा (१९७५ ते २०००) (संपादन), दत्ता पाटील, नीलेश शेळके, अक्षर दालन, कोल्हापूर, ऑगस्ट, २०१८.