निर्णय क्षमता
निर्णय क्षमता
- एखाद्या विषयाबाबत अनेक पर्यायांमधून कोणता पर्याय निवडायचा ते ठरवणे आणि त्यानुसार कृती करणे
- काही निर्णय झटकन घेता येतात, तर काहींबाबत खूप काळ लागतो.
- वेळेवर, जबाबदारीने, विचारपूर्वक घेतलेले निर्णय अधिक फलदायी ठरतात.
- काही निर्णय व्यक्तिगत, तर काही सामूहिक.
- मात्र, कोणताही निर्णय कधीही १००% योग्य नसतो!
कसकसा घ्यायचा निर्णय?
‘माझे व्यक्तिगत निर्णय मी घेणार’ असे ठरवायचे. कोणकोणत्या गोष्टींविषयी स्वतः निर्णय घ्यायचे आहेत , त्याचे भान ठेवायचे. स्वतःच्या आवडी-निवडी, सोय-गैरसोयी, प्राधान्ये, मूल्ये हे लक्षात घ्यायचे वेळच्यावेळी निर्णय घायचा. कधी वेळेच्या आधीच घ्यायचा. निर्णय प्रक्रियेचे टप्पे जाणीवपूर्वक चढायचे. या सगळ्यासाठी सारासार विचार, धीटपणा , कणखरपणा जोपासायचा.
निर्णय घेण्याचे टप्पे'
- निर्णयविषय समजून घेणे, वस्तुस्थिती जाणणे
- निर्णय घेण्यासाठीचे आधार, निकष ठरवणे
- निर्णयासाठी अनेक पर्याय शोधणे
- निकषांच्या आधारे पर्याय तोलणे
- उत्तम पर्याय निवडणे
- त्यानुसार कार्यवाही करणे
- निवडलेल्या पर्यायाचे परिणाम कालांतराने जोखणे
- निर्णय प्रक्रियेमध्ये सुधारणा करत राहणे
पाल्यांमधील निर्णयक्षमता
१. तान्हेपणापासून जोपासणे शक्य! २. प्रतिसादात्मक/लोकशाही पालकत्व शैली उपयुक्त ३. परस्परावलंबन कमी ४. उभयतांमध्ये परिपक्वता, विश्वास, आदर