निरुपमा दत्त
निरुपमा दत्त (जन्म १९५५) या एक भारतीय कवयित्री, पत्रकार आणि अनुवादक आहेत. त्या पंजाबीमध्ये कविता लिहितात आणि स्वतः इंग्रजीत अनुवादित करतात.[१][२]
कारकीर्द
दत्त या चाळीस वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. त्यांनी अनेक आघाडीच्या भारतीय वृत्तपत्रे आणि नियतकालिकांसाठी काम केले आहे. बंट सिंग, दलित आयकॉन, द बॅलड ऑफ बंट सिंग: अ किस्सा ऑफ करेज हे चरित्र त्यांनी लिहिले आहेआहे. पंजाबचे दलित क्रांतिकारक कवी लाल सिंग दिल यांच्या आठवणी आणि कवितांचा पोएट ऑफ द रिव्होल्यूशन: द मेमोयर्स अँड पोम्स ऑफ लाल सिंग दिल हा एक खंड प्रकाशित केला आहे. त्यांच्या इक नदी संवाली जही (एक प्रवाह काहीसा गडद) कवितांसाठी त्यांना २००चा पंजाबी अकादमी पुरस्कार देण्यात आला.[२]
त्यांच्या कविता इंग्रजी, हिंदी, कन्नड, बंगाली आणि उर्दूमध्ये अनुवादित केल्या गेल्या आहेत. २००४ मध्ये त्यांनी अजित कौर यांच्यासोबत अवर व्हॉइसेस नावाच्या काव्यसंग्रहाचे संपादन केले.[३][४]
गुलजारच्या छोट्या कवितांचा त्यांनी प्लूटो नावाने अनुवाद केला आहे आणि स्टोरीज ऑफ द सॉइल हा ४१ पंजाबी कथांचा इंग्लिशमध्ये अनुवाद आहे. याबरोबरच हाफ द स्काय नावाच्या पाकिस्तानी महिला लेखकांच्या काल्पनिक कथांचे पुस्तक आणि चिल्ड्रन ऑफ द नाइट नावाचे पाकिस्तानातील प्रतिरोधक साहित्याचे संपादन देखील केले आहे.
पत्रकार या नात्याने दत्त यांनी कट्टरतावाद आणि जातीयवादाच्या विरोधात धर्मनिरपेक्षतावादी भूमिका घेतली आहे. पंजाबमधील दहशतवाद, नोव्हेंबर १९८४ शीखांचे हत्याकांड, बाबरी मशीद विध्वंस आणि गुजरात नरसंहार या विषयांवर त्यांनी लेखन केले आहे. निरुपमा यांच्या कविता पोएट्री वेब इंटरनॅशनलवर प्रदर्शित झाल्या आहेत. तसेच त्या हमशिरा नावाच्या महिला अभ्यास गटाच्या निमंत्रक आहेत.[५]
संदर्भ
- ^ "Book Review: The Ballad of Bant Singh- A Qissa of Courage". DNA India (इंग्रजी भाषेत). 2022-03-07 रोजी पाहिले.
- ^ a b "Pakistan women authors honoured" (इंग्रजी भाषेत). 2005-02-10.
- ^ Service, Tribune News. "Beauty beyond colour: Journalist takes jibe on fixation with fairness". Tribuneindia News Service (इंग्रजी भाषेत). 2022-03-07 रोजी पाहिले.
- ^ "Nirupama Dutt (poet) - India - Poetry International". www.poetryinternational.org. 2022-03-07 रोजी पाहिले.
- ^ "The story of a man searching for himself" (इंग्रजी भाषेत). 2013-01-06. ISSN 0971-751X.