निम्राना हॉटेल्स
निम्राना हॉटेल्स भारतातील पडीक ऐतिहासिक स्थळांचे पुनर्निर्माण करून त्यांना हॉटेल्स मध्ये रूपांतरित करणारी संस्था आहे.[१][२][३][४]
या संस्थेची स्थापना १९९१ मध्ये अमन नाथ आणि फ्रान्सिस वाकझीयार्ग यांनी केली होती. अमन नाथ यांनी दिल्ली विद्यापीठातून मध्ययुगीन भारताचा इतिहास या विषयात पदव्युत्तर पदविका संपादन केली होती [५] तर फ्रान्सिस हे फ्रेंच राजदूत होते जे १९६९ पासून भारतात राहत होते. ते दोघे शेखावतीची भित्तीचित्रे[२] लिहिण्यासाठी भित्तीचीत्रांवर संशोधन करत असतांना त्यांना राजस्थानमधील अरावली पर्वतरांगांमधील १५ व्या शतकातील निम्राना किल्ल्याबद्दल कळले.[६] हा किल्ला स्थानिक प्रमुख निमोला मेओ [६] याने बांधला होता. आणि हा किल्ला ४० वर्षांपासून भग्नावस्थेत पडलेला होता. १९८६ मध्ये त्यांनी हा किल्ला ७ लाख रुपयांना विकत घेतला [७] आणि त्याचे पुनर्निर्माण करून १९९१ मध्ये १२ खोल्यांचे हॉटेल खुले केले.[८] त्यानंतर ह्या हॉटेलचा २००२ मध्ये मास्टरमाईंड इंडिया द्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय भारतीय साहित्य महोत्सवाचे कार्यक्रमस्थळ म्हणून [६] तसेच इतर काही लग्नांसाठी वापर झाला.[२]
पुनर्निर्माण प्रक्रिया
ह्या स्थळांचे पुनर्निर्माण करतांना त्यांचे मूळ डिझाईन तसेच राहावे म्हणून फक्त आवश्यक सोयींचाच बदल करण्यात आला जसे कि प्लंबिंग आणि वातानुकूलन व्यवस्था.[८] डिझाईनचे प्रभावीपण दाखवण्यासाठी ते त्यांना नॉन हॉटेल्स म्हणतात.[६] या इमारतींचे पुनर्निर्माण अनेक टप्प्यांमध्ये होते. पुनर्निर्मित भागाच्या पर्यटकांच्या वापरातून मिळालेल्या निधीमधून इतर भागांचे पुनर्निर्माण केले जाते.[८] या प्रक्रियेत ते स्थानिक मजुरांचा तसेच साहित्याचा वापर करतात ज्यामुळे खर्च कमी राहतो आणि कामही लवकर होते. जिथे सामान्य हॉटेल्सला ६-७ वर्ष लागतात तिथे ह्यांचे काम फक्त २-३ वर्षात होते.
पंजाब सरकारने पतियाळा मधील बारादरी राजवाडा सरकारी-खाजगी भागीदारी तत्त्वावर हस्तांतरित केला. तसेच राजस्थान सरकारने तिजारी किल्ला भाडेतत्त्वावर दिला. याचप्रकारे त्यांना पतौडी राजवाडा विकण्यात आला आणि ठाकूर मंगल सिंग ने अलवार मधील १४व्या शतकातील केसरोली राजवाडा विकला. अलवार मधील तिजारी किल्ला हा पडीक नसून १८४५ मध्ये युद्धामुळे बांधकाम अर्धवट राहिलेला किल्ला होता. त्या द्वयींनी त्याचे बांधकाम हाती घेतले. बहुतांश प्रकल्प त्यांच्याकडे काम घेऊन येणाऱ्या मालकांनीच सुरू केले होते आणि त्यांच्याकडे २ पेक्षा जास्त संभाव्य प्रकल्प होते.[२][८]
तसेच कंपनी रामगढ मधील फळबागांमधील फळांपासून जॅम बनविते. तसेच कुन्नूर मध्ये चहाच पावडर आणि कूर्ग मध्ये कॉफीचे उत्पादन घेते. तसेच कंपनी ‘निम्राना म्युझिक फौंडेशन’ पण चालविते. त्यांच्या सदस्यांमध्ये आधी बहुतांश विदेशी सदस्य होते ज्यात आता ७०% भारतीय आहेत (२०१० च्या आकडेवारीनुसार).[२]
२०११ मध्ये, निम्राना हॉटेल्सकडे १७ ठिकाणी २५ प्रॉपर्टीज होत्या आणि त्यांचे ४.७ मिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त उत्पन्न होते.
उदाहरणे
1) १४वे शतक – हिल फोर्ट केसरोली (अलवार, राजस्थान) [६]
2) १५वे शतक – निम्राना फोर्ट – पॅलेस (दिल्ली – जयपूर हायवे, शेखावती, राजस्थान) [६]
3) १६वे शतक – ले कोलोनीयल (कोचीन, केरळ)
4) १७वे शतक – द टॉवर हाउस (कोचीन, केरळ)
5) १७वे शतक – द बंगलो ओन द बीच (थारंगमबडी, तामिळनाडू) [६]
6) १७वे शतक – द गेट हाउस (थारंगमबडी, तामिळनाडू)
7) १८वे शतक – हॉटेल द ओरिएन्ट (पुदुच्चेरी) [६]
8) १९वे शतक – द वरंडाह इन द फोरेस्ट (ब्रिटिश) (माथेरान, मुंबई)
9) १९वे शतक – दरबारगढ पॅलेस, मोरवी, गुजरात
10) १९वे शतक – विला पोत्तीपती (माल्लेस्वराम, बंगलोर, कर्नाटक) [६]
11) १९वे शतक – द वालवूड गार्डन (कुन्नोर, तामीळनाडू) [६]
12) १९वे शतक – ग्रीन हिल्स इस्टेट (कोडगू, कर्नाटक)
13) १९वे शतक – द बारादरी पॅलेस (पतियाळा, पंजाब) [६]
14) १९वे शतक – द रामगढ बंगलो (रामगढ – कुमाव हिल्स, उत्तराखंड) [६]
15) २०वे शतक – पिरामल हवेली (बागर, शेखावती, राजस्थान) [६]
16) २०वे शतक – पतौडी पॅलेस (पतौडी, हरयाणा) [६]
17) २१वे शतक – ग्लास हाउस ओन द गंगा (ऋषिकेश, उत्तराखंड) [६]
18) तिजारा फोर्ट, अलवार, राजस्थान
संदर्भ
- ^ Mentions (some detailed) in about 72 books and 8 papers and 43 news sources
- ^ a b c d e Pramila N. Phatarphekar, Accidental Hoteliers, Open Magazine, 24 April 2010
- ^ "The heritage tourism specialists". Financial Express. 31 October 2010.
- ^ "About Neemrana The Glasshouse On The Ganges, Rishikesh" Archived 2011-06-07 at the Wayback Machine., cleartrip.com, 27 May 2017
- ^ Alka Pande, A new lease of life Archived 2011-06-07 at the Wayback Machine., The Hindu, 1 August 1999
- ^ a b c d e f g h i j k l m n o Savita Gautam, Ruins revisited Archived 2011-07-23 at the Wayback Machine., The Hindu, 29 July 2004
- ^ Malini Suryanarayan, "An interview with Mr. Aman Nath, architect, interior designer and art restorer" Archived 2011-06-07 at the Wayback Machine., The Hindu, Wednesday, 20 December 2000
- ^ a b c d Malini Goyal , Forbes India, Hotel kings bring back the fine life to palaces Archived 2011-06-19 at the Wayback Machine., IBN Live, 24 August 2009