निमारी गाय
निमारी किंवा निमाडी (इंग्रजी:Nimari) हा शुद्ध भारतीय गोवंश असून हा मुख्यतः मध्यप्रदेशच्या नर्मदेच्या खोऱ्यात आणि महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतो.[१]. हा गोवंश गीर आणि खिल्लारी या दोन भारतीय गोवंशाच्या संकरातून निर्माण केल्या गेलेला आहे.
शारीरिक रचना
मध्यम ते उंच बांधा हे याचे मुख्य वैशिष्ट्य असून, याचा रंग लाल/तपकिरी असतो. शरीरावर पांढऱ्या रंगाचे डाग असतात. काही ठिकाणी गडद रंग पण दिसून येतो. शरीर बांधा आकर्षक, लांब व उंच असून डोके सुद्धा मोठे लांब असते. गळ्यातील पोळी सुद्धा मोठी व आखीव वळणदार असते. कान जाड, मध्यम ते मोठे व टोकदार असतात. शिंग सहसा आखूड ते मध्यम असतात. पाय लांब काटक असून पायाची खुरं मजबूत असतात. यामुळे हे प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा चांगले काम करू शकतात. डोळे व नाक काळेभोर, शेपटी मध्यम आकाराची असते.[२]
वैशिष्ट्य
हा मध्यम ते उंच बांध्याचा आणि मजबूत शरीरयष्टीचा गोवंश आहे. याचा तापट स्वभाव असल्याने शेतीकामासाठी आणि वेगाने धावण्यासाठी हा अत्यंत उपयुक्त गोवंश ठरतो. गाय कमी दूध देणारी असून अपवादानेच दुधाचे प्रमाण जास्त दिसून येते.
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ "Conservation of Madhya Pradesh Native Breeds of Cattle". 2020-02-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.
- ^ Bajpai, Diti. "क्या आपको भारत की इन 43 नस्ल की गायों के बारे में पता है?". www.gaonconnection.com (इंग्रजी भाषेत). 2020-11-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. १० फेब्रुवारी २०२१ रोजी पाहिले.