निमसोड (कडेगांव)
?निमसोड महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | कडेगांव |
जिल्हा | सांगली जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
निमसोड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील कडेगांव तालुक्यातील एक गाव आहे. गावची लोकसंख्या अंदाजे २००० - २१०० पर्यंत असुन मतदार १४५० इतके आहे. निमसोड हे गांव जिल्हाठिकणापासुन ८० कि.मि. आहे तर तालुक्यापासुन ३.५ कि.मी. आहे. गांवचे भौगोलिक क्षेत्र ३८४ हेक्टर असुन ९०% क्षेत्र बागायती आहे. गावचे मुख्य पिक ऊस असुन आले हे पिकसुद्धा मोठ्या प्रमाणावर घेतले जाते .त्याचबरोबर सोयाबिन,भुईमुग,ज्वारी,गहु, हरबरा, मुग, उडीद, इ. पिकेही घेतली जातात.
गावापासुन तालुका ठिकाण जवळ असलेने गावचे खरेदी-विक्री व्यवहार कडेगांव येथे होतात. गावामध्ये दोन अंगणवाडी असुन एक इ.७ वीपर्यंत मराठी माध्यमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी कडेगांव , कराड किंवा विटा या शहरांमध्ये जावे लागते. शाळेला जिल्हा परिषदेचा स्वच्छ-सुन्दर शाळा द्वितीय क्रमांक मिळाला आहे. दोन जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार श्री. आपटे गुरुजी व श्री.मंगेश बणसोडे गुरुजी यांना मिळाला आहे.
गावामध्ये ग्रामपंचायत आहे. त्याची स्थापना सन १९५६ साली झाली.गावचे पहिले सरपंच होण्याचा बहुमान श्री. गणपती मारुती मुळिक यांना मिळाला.तसेच गावच्या शेतीविकासासाठी सहकारी विकास सोसायटी स्थापना केलेली आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.