निफाड
भारतातील मानवी वस्ती | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | मानवी वसाहती | ||
---|---|---|---|
स्थान | नाशिक जिल्हा, नाशिक विभाग, महाराष्ट्र, भारत | ||
समुद्रसपाटीपासूनची उंची |
| ||
| |||
निफाड तालुक्याचा अभ्यास
हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्याचा एक तालुका आहे.
निफाड तालुकानिफाड तालुका | |
---|---|
राज्य | महाराष्ट्र, भारत |
जिल्हा | नाशिक जिल्हा |
जिल्हा उप-विभाग | निफाड उपविभाग |
मुख्यालय | निफाड |
क्षेत्रफळ | १०५३ कि.मी.² |
लोकसंख्या | ४,३९,८४२ (२००१) |
साक्षरता दर | ६८% |
प्रमुख शहरे/खेडी | पिंपळगाव.ब.,लासलगांव. |
लोकसभा मतदारसंघ | दिंडोरी (लोकसभा मतदारसंघ) |
विधानसभा मतदारसंघ | निफाड विधानसभा मतदारसंघ |
आमदार | दिलीपराव बनकर |
पर्जन्यमान | ४८१ मिमी मुख्य पिके = द्राक्षे,ऊस,टोमॅंटो, इ. मिमी |
निफाड तोड ओळख :-
भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्याचे शहर आहे. निफाड शहर हे तालुक्याच्या मध्यवर्ती भागात आहे. निफाड अर्थात एक ही पहाड नसलेले. येथे निफाड सहकारी साखर कारखाना आहे .तसेच हे एक मध्य रेल्वेचे स्थानकही आहे. न्या. महादेव गोविंद रानडे यांचा जन्म निफाड येथे झाला. निफाड तालुक्यात लासलगाव ही आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. द्राक्ष व ऊस उत्पादनात तालुका अग्रेसर आहे. निफाड शहरात भरपूर तेल गिरण्या आहे. निफाड तालुक्यात निफाड, पिंपळगाव, लासलगाव व ओझर ही शहरे आहे तसेच ग्रामीण भाग देखील सुजलाम सुफलाम आहे. तालुक्यात ओझर येथे मिग विमानाचा (HAL) कारखाना आहे. तालुक्यात नांदूर-मधमेश्वर पक्षी अभयारण्य आहे, त्याला महाराष्ट्राचे भरतपूर असेही म्हणले जाते. तसेच गोदावरी नदीवर नांदूर मधमेश्वर धरण आहे. येथे कादवा व गोदावरी नद्यांचा संगम होतो. निफाड शहरातून नासिक, छ.संभाजीनगर, चांदवड, सुरत व सिन्नर चहूबाजूंना जाण्यास राज्यमार्ग आहे. सध्या फक्त राजकारण्यांच्या उदासीनतेमुळे नासिक व छ.संभाजी नगरला जोडणाऱ्या मार्गाचेच चौपदरीकरण झाले ले आहे. निफाड तालुक्यातील निफाड व लासलगाव कांदा व लसूण उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. निफाड तालुक्यास महाराष्ट्राचे कोलिफॉर्निया म्हणून ओळखले जाते. निफाड एक मोठी बाजारपेठ आहे.शहराचे नगरपंचायत कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात आहे. निफाड शहरास प्राचीन मंदिरांचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. ह्या वारशाचे जतन करण्याची गरज व आवश्यकता आहे. तसेच कादवा-विनता या दोन नद्यांचा येथे संगम होतो. तसेच तालुक्यातील भरपूर युवक वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कतृत्वाचे ठसे उमटवत आहे. अशाप्रकारे निफाड शहर व तालुका हे विविधतेने नटलेले आहे असे मी येथे नमूद करतो. एक सुजाण नागरिक म्हणून माझ्या शहराचा मला अभिमान आहे.
प्रमुख गावे
पिपळगाव बसवंत, लासलगाव, ओझर, म्हाळसाकोरे, सायखेडा, नांदूर माध्यमेशोर, तारुखेडले,तामस वाडी, करंजी, मांजर गाव, भुसे ,भेंडाळी, करजगाव, चांदोरी, निफाड, विंचुर, सावरगाव, वनसगाव, उगाव, सोन गाव,शिवरे, गाजर वाडी, धारणगाव, कोळगाव, खेडले झुंगे, खान गाव थंडी, कोठूरे, रुई , भाऊसाहेबनगर, पि पळस, ओणे, सुकेणे,
पर्जन्य। 70 से.मी
हवामान- १) मान्सून - मद्य जून ते सप्टेंबर
2) हिवाळा- ऑक्टोबर ते मार्च
3) उन्हाळा - मार्च ते जुन
मातीचे प्रकार । - १) काळी माती
2) रेगुर माती
3) तांबडी माती
नद्या। गोदा वरी, कादवा, कडवा
प्रमुख शेती उत्पादने - गहू, बाजरी, हरबरा, भात, सोयाबीन, कांदा, तांबटे, मेथी,शेपू, कोबी,मका, द्रक्ष,
कुषी उत्पादनाच्या प्रमुुुख बाजार पेेठा - लासलगाव, पिपळगाव ,विंचुर, निफाड, हा