Jump to content

निपाणी शहराचे आर्थिक अवलोकन

निपाणी शहराचे आर्थिक अवलोकन निपाणीला कोकणचे आर्थिक प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. नारळ, काजू, मीठ, मसाला, खोबरे या वस्तू राजापूर, वेंगुर्ला, मालवण, येथून येत तर जोंधळा, गुळ, शेंग, तंबाखू, ताग, मिरची, भुईमुग, हा माल स्थानिक शेतकरयाकडून पिकवाला जाई.

निपाणी परिसरात पिकणारा तंबाखू संपूर्ण भारतामध्ये उच्च प्रतीचा मानला जातो, दरवर्षी ५०० कोटीहून अधिक उलाढाल होते. येथील व्यापाऱ्यांनी मद्रास, कलकत्ता, व भारतातील निरनिराळ्या भागामध्ये हा तंबाखू पाठवतात. १९६१ च्या आकडेवारीनुसार त्यावेळी जवळ जवळ १८० वखारी होत्या, तर त्याला जोडधंदा म्हणून बिडी व्यवसाय सुद्धा निपाणीत चालत होता. बेळगाव जिल्ह्यामध्ये निपाणी रामदुर्ग, अंकलगी या ठिकाणी हा व्यवसाय चालतो. १९८० च्या दरम्यान बिडी कामगारांची संख्या १५०० होती तर जवळजवळ २०० तंबाखू पेढ्या होत्या, तंबाखू व्यापाराला अनुसरून अनेक व्यवसाय या ठिकाणी चालतात सध्या ऊस उत्पादनाचे प्रमाण सुद्धा निपाणीत सुरू झाले आहे. तर हलसिध्नाथ साखर कारखाना, हिंदुस्थान लेटकस लिमिटेड, इंडियन ऑइल प्लॅंन्ट तसेच ॲलुमिनियम भांडी कारखाना, अरोरा इंडस्ट्रीज, प्लास्टर ऑफ पॅरिस इंडस्ट्रीज, सौ मिल्स, ओईल मिल्स, टेक्सटाइल इंडस्ट्रीज यांनी निपानीच्या औधोगिक विकासाला चालना दिली आहे. त्याचप्रमाणे निपाणीमध्ये १९३८ मध्ये कृषी संजीवन केंद्र सुरू करण्यात आले असून या केंद्राचा मुख्य उदेश तंबाखू क्षेत्रामध्ये सुधारणा घडूवून आणणे हा होता. तंबाखूसाठी योग्य जमीन शोधून काढणे व त्या पद्धतीचा तंबाकूची बियाणे विकसित करणे हा उद्देश होता त्याचप्रमाणे आनंद-२ आनंद ११९ हा तंबाखू विकसित केला आहे व बाजरी, गहू, मक्का, कापूस, मिरची यामध्ये संशोधन केले आहे, एकूण २२ एकरमध्ये हे कृषी केंद्र वसवले आहे. [ संदर्भ हवा ]