निनाद फाउंडेशन
निनाद फाउंडेशन ही पुण्यातील समाजसेवी संस्था आहे. ही संस्था पर्यावरणाचे आणि निसर्गाचे संवर्धन करण्याच्या हेतूने सन २०१८ मध्ये स्थापन झाली. त्यानंतर त्यांनी पर्यावरण सुरक्षिततेसाठी अनेक उपक्रम राबविले. पर्यावरणामध्ये देखील वृक्षारोपण हा विषय संस्थेच्या केंद्रस्थानी असून लावलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याकडे त्यांचा कल असतो. ही संस्था पर्यावरणाबरोबरच त्याच्या संरक्षणासाठी लोकप्रबोधनही करते.
ही संस्था महाराष्ट्र राज्यातील गावांमध्ये काम करीत असून त्याची स्थापना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी केली आहे.
वैशिष्ट्य :[१]
१ ‘निनाद फाऊंडेशन’ म्हणजे तरुणांनी पर्यावरणासाठी केलेले काम.
२ कोणत्याही संस्थेचे निनादला आर्थिक पाठबळ नाही, आत्तापर्यंत संस्थेचे उपक्रम हे महिन्याला सर्व सदस्यांकडून किमान ५० रु. योगदान जमा करून झाले आहे.
३ ‘निनाद’च्या सदस्यांची आर्थिक क्षमता पाहिली जात नाही तर, सभासदांच्या गुणकौशल्याना आणि सहभागाला महत्त्व असते.
४ ‘निनाद’ मधील सदस्यांबरोबरच नवीन सदस्यांच्या मदतीने ‘निनाद’चा विकास होत आहे.
५ ‘निनाद’ मधील प्रत्येक सदस्य एकसमान पातळीवर राहून आपली कामगिरी पार पडत आहे.
उपक्रम
- नानगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राशेजारी वृक्षारोपण.
- अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप व वृक्षारोपण.
- संस्थेने २०१९-२०२० या वर्षात सासवड मधील जाधवगड येथे ५५ कडुलिंबाची झाडे लावली. ह्या झाडांची नियमित काळजी घेतली जाते.
- दौंड तालुक्यातील पारगाव या गावामध्ये विद्यार्थ्यांनी खड्डे खोदून ११० झाडे लावली.
- पारगाव(सा.मा.) येथील गरजू व्यक्तींना मदत म्हणून सुस्थितीत असलेले कपडे गोळा केले आणि त्या कपड्यांचे वाटप
- म.ए.सो. ने आयोजित केलेल्या विद्यादान निधी या उपक्रमाअतंर्गत “निनाद फाऊंडेशनतर्फे” आर्थिक योगदान देण्यात आले.
- दौंड तालुक्यातील पारगावमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना कपडे, पाटी-पेन्सिल,व पणत्या वाटल्या.
- दौंड तालुक्यातील नानगाव (अमोनिमाळ) येथील जि.प प्राथमिक शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य आणि क्रीडा साहित्य यांचे वाटप केले.
- वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून, हुशार आणि होतकरू मुलांना बक्षीस म्हणून शैक्षणिक साहित्य वाटले.
- मकर संक्रातीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रमात जाऊन त्यांना रोजच्या वापरासाठी धान्य देऊन सण साजरा केला.
- सांगलीमध्ये ओढवलेल्या पूर प्रसंगात “निनाद फाऊंडेशन”ने १३ सप्टेंबर,२०१९ रोजी तेथील विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य दिले.
नोव्हेंबर, २०१९ काम केलेली ठिकाणे
- पारगाव
- नानगाव
- पारगाव( वाडी-वस्ती)
- नानगाव(वाडी-वस्ती)
- देलवडी
- निमोणे
- न्हावरा
- जाधवगड (सासवड)
- अंकलखोप (सांगली)
- मातोश्री वृद्धाश्रम (पुणे)
संदर्भ
- http://darpannews.co.in/?p=6359
- http://pratishthanews.com/?p=3519
- https://m.facebook.com/story.php?story_fbid=2109922445725763&id=585605434824146
- ^ "Google ड्राइव्हला भेट द्या – आपल्या सर्व फायलींसाठी एकच ठिकाण". accounts.google.com. 2019-12-01 रोजी पाहिले.