निधर्मी
निधर्मी हा धर्म नसलेल्या व्यक्ती किंवा व्यक्ती समूह आहे. निधर्मी लोक हे कोणत्याही विशिष्ट धर्माशी जोडलेले नसतात. निधर्मी बहुदा नास्तिक असतात. जगभरात १ अब्जांवर निधर्मींची लोकसंख्या आहे, तर भारतात ३० लाखापेक्षा जास्त निधर्मी आहेत. रशिया, चीन, जपान, व्हिएतनाम या देशांत निधर्मी लोकसंख्या अधिक प्रमाणात आहे.