नितीन चंद्रकांत देसाई
नितीन चंद्रकांत देसाई | |
---|---|
जन्म | नितीन चंद्रकांत देसाई ९ ऑगस्ट १९६५ मुंबई, महाराष्ट्र ठाणे |
मृत्यू | २ ऑगस्ट, २०२३ (वय ५७) कर्जत, मुंबई |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | १९८७ - २०२३ |
भाषा | मराठी |
प्रमुख चित्रपट |
|
पुरस्कार | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार |
नितिन चंद्रकांत देसाई (९ ऑगस्ट १९६५ - २ ऑगस्ट २०२३) हे एक भारतीय कला दिग्दर्शक, प्रॉडक्शन डिझायनर, चित्रपट व दूरदर्शन निर्माता होते. मराठी आणि हिंदी चित्रपटांतील त्यांचे काम, २०१६ चा दिल्ली येथील जागतिक सांस्कृतिक महोत्सव, हम दिल दे चुके सनम (१९९९), लगान (२००१), देवदास (२००२), जोधा अकबर (२००८) आणि प्रेम रतन धन पायो (२०१५) यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या कामासाठी ते सर्वाधिक प्रसिद्ध होते. वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी आशुतोष गोवारीकर, विधू विनोद चोप्रा, राजकुमार हिरानी आणि संजय लीला भन्साळी यांसारख्या दिग्दर्शकांसोबत काम केले. [१] २००२ मध्ये ते चित्रपट निर्माता बनले आणि चंद्रकांत प्रॉडक्शन्स द्वारा देश देवी नावाचा कच्छच्या देवी मातेवर भक्ती चित्रपट त्यांनी काढला. [२]
देसाई यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन वेळा फिल्मफेअर उत्कृष्ट कला दिग्दर्शन पुरस्कार मिळाला. २००५ मध्ये त्यांनी ५२ एकर जागेत कर्जत, नवी मुंबई येथे एनडी स्टुडिओ सुरू केला. या स्टुडिओत जोधा अकबर, ट्रॅफिक सिग्नल सारख्या चित्रपटांची निर्मिती झाली आणि कलर्स वाहिनीचा कार्यक्रम बिग बॉस सुरू आहे. [३] [४]
२ ऑगस्ट २०२३ रोजी कर्जतमधल्या त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी आत्महत्या केली.[५][६]
बाह्य दुवे
- "नितिन देसाई स्टुडिओ, अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2011-07-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-26 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील नितीन चंद्रकांत देसाई चे पान (इंग्लिश मजकूर)
- The Miracle Worker Screen
संदर्भ
- ^ Art Director Nitin Desai accredited for his long career International Reporter, MIL/TNN, 19 January 2008.
- ^ Mammoth crowd turns up for premiere in Kutch Screen, 22 November 2002.
- ^ Nitin Desai on Bollywood, ND Studio and much more CNN IBN, 10 May 2008.
- ^ Nitin Desai's Movie Studio: A Tour Business of Cinema, Rohini Bhandari, 9 March 2007.
- ^ "नितीन चंद्रकांत देसाई - Google Search". www.google.com. 2023-08-05 रोजी पाहिले.
- ^ "नितीन देसाई तेव्हा 13 दिवस कामात एवढे मग्न होते की घरचे बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवायच्या तयारीत होते". BBC News मराठी. 2023-08-02. 2023-08-05 रोजी पाहिले.