Jump to content

निजामाबाद पर्यटन

== निजामाबाद पर्यटन==

तेलंगणा जिल्ह्यतील निजामाबाद हे हळदीच्या व्यापाराचे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे ठिकाण आहे .

येथील  साखर कारखाना आशिया खंडातील मोठा कारखाना समजला जातो .

==असापासची ठिकाणे==

सारंगपूर :येथे रामदास स्वामींनी स्थापन केलेला मठ व हनुमान मंदिर येथे आहे . निजामाबादपासून ६.km अंतरावर हा मठ आहे . .दुष्काळात पाऊस पडावा म्हणून स्वामींनी येथे देवळा प्रार्थना केली . पावसास सुरुवात झाली . समर्थानी आपल्या छाटीने एक शिळेवर मूर्तीचा लाईनआउट दिला व तेथे सुंदर हनुमानाची मूर्ती साकारली असे सांगितले जाते.

==निजामाबाद किल्ला == निजामाबाद येथील किल्ला एका छोट्या टेकडीवर आहे १० व्या  शतकात राष्ट्रकूट राजांनी बांधला . छत्रपती शिवाजी महाराजांनी येथील राम मंदिर बांधले असे सांगितले जाते .

==निळकंठेश्वर मंदिर :== हे मंदिर  सातवाहन राजा सातकर्णी याने  बांधले होते नंतर काकतीय राजांनी तिथे शंकराचे मंदिर बनविले . अत्यंत सुंदर असे हे मंदिर आहे . हनुमान मंदिर,  केतू मशीद , श्री रघुनाथ मंदिर, श्री लक्ष्मी नरसिम्हा स्वामी मंदिर, ही इतर ठिकाणे

==पुरातत्त्व संग्रहालय ==

येथील पुरातत्त्व संग्रहालय टिळक गार्डन मध्ये असून ते १९३६ साली निर्माण केले आहे . ५००० वर्ष पूर्वीची मानवाची हत्यारे ,अश्मयुगीन हत्यारे हे येथील वैशिष्ट्य आहे. काकतीय ,सातवाहन इक्षवाकु(नागर्जुनकोंडा ) व कुतुबशाही राजवटीतील नाणी पहाण्यास मिळतात . हे संग्रहालय पुरातत्त्व --शिल्पकला --ब्राँझ अश्या तीन विभागात करणेत आले आहे .इस पूर्व १००० या काळातील अनेक वस्तू येथे बघणेस मिळतात . महापाषाण युगातील मातीची भांडीही येथे आहेत

[[वर्ग: भारतीय पर्यटन]]

[[वर्ग: तेलंगणा राज्य ]]

[[ वर्ग :निजामाबाद ]]