Jump to content

नाशेरा

  ?नाशेरा

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ१.११३ चौ. किमी
जवळचे शहरमोखाडा
जिल्हापालघर जिल्हा
लोकसंख्या
घनता
१,०८० (२०११)
• ९७०/किमी
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषावारली
कोड
पिन कोड
• आरटीओ कोड

• ४०१६०४
• एमएच/४८ /०४

नाशेरा हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

हे मध्यम आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २१३ कुटुंबे राहतात. एकूण १०८० लोकसंख्येपैकी ५४३ पुरुष तर ५३७ महिला आहेत. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.

नागरी सुविधा

गावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस मोखाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा मोखाडावरून उपलब्ध असतात.

जवळपासची गावे

पिंपळगाव, शिवाळी, कोशिमशेत, धामणशेत, डोल्हारे, शिरसगाव, आडोशी, पाथर्डी, बोटोशी, कुरलोड, केवनाळे ही जवळपासची गावे आहेत.नाशेरा गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत आहे.

संदर्भ

१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html

२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html

३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

४. http://tourism.gov.in/

५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036

६. https://palghar.gov.in/

७. https://palghar.gov.in/tourism/