नाळ (चित्रपट)
नाळ (इंग्रजी: अंबिलिकल कॉर्ड) हा २०१८ मध्ये प्रदर्शित मराठी चित्रपट असून तो सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित असून नागराज मंजुळे निर्मित आहे. हा चित्रपट १६ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला.[१] टाईम्स ऑफ इंडियाच्या पुनरावलोकनात म्हणले आहे की, "नाल" ही एक सुंदर उत्कृष्ट चित्रपट आहे, मुख्यत: भावनिक कथा आणि कामगिरीमुळे. " ६६ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०१९ मध्ये या चित्रपटाने दिग्दर्शक साठी सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट म्हणून गौरव करण्यात आला. [२]
नाळ | |
---|---|
निर्मिती | नागराज मंजुळे सुधाकर रेड्डी यंकट्टी वैशाली विराज लोंढे निखिल वरडकर नितीन प्रकाश वैद्य प्रशांत मधुसूदन पेठे |
कथा | सुधाकर रेड्डी यंकट्टी |
पटकथा | सुधाकर रेड्डी यंकट्टी |
प्रमुख कलाकार | श्रीनिवास पोकळे नागराज मंजुळे देविका दफ्तरदार |
संगीत | अद्वैत नेमलेकर ए.व्ही. प्रफुल्लचंद्र (अतिथी संगीतकार) |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
वितरक | आटपाट चित्रपट मृदगांडा चित्रपट |
अवधी | १ तास ५७ मिनिट |
निर्मिती खर्च | ३ कोटी |
एकूण उत्पन्न | ४० कोटी |
कथा
चैत्या (श्रीनिवास पोकळे) एका छोट्या गावात आई (देविका दफ्तरदार) वडील (नागराज मंजुळे) आणि आजी सोबत राहत असतो. तो आई, वडील, आजी यांचा प्रचंड लाडका असतो. त्याचे कुटुंब हेच त्याचे जग असते. गावातल्या मुलांसोबत मस्ती करणे, नदीत खेळणे ही त्याची आवडती कामे आहेत.[३]
एखाद्या लहान मुलाप्रमाणेच तो आपल्या कुटुंबियांसोबत, मित्रमैत्रिणींसोबत आपल्या आयुष्यात रममाण असतो. पण एक दिवस त्याच्या घरी त्याचा एक मामा (ओम भुतकर) येतो. या मामला त्याने कधीच पाहिलेले नसते. या मामाकडून त्याला कळते की, त्याचे आई वडील हे त्याचे खरे पालक नसून त्यांनी त्याला दत्तक घेतले आहे, हे कळल्यावर त्या चिमुकल्याच्या मनाची काय घालमेल होते हे दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यांनी खूप छान प्रकारे मांडले आहे.[४]
सुरुवातीला चित्रपट थोडासा संथ वाटत असला तरी नंतर चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरतो. चित्रपटात सगळ्याच कलाकारांनी अतिशय सहजपणे अभिनय केला आहे. श्रीनिवास, देविका, नागराज या सगळयांनी आपल्या भूमिका चोखपणे पार पाडल्या आहेत. श्रीनिवासच्या चेहऱ्यावरील निरागस भाव तर प्रेक्षकांचे मन जिंकतात.[५]
अनेक दृश्यात संवाद नसताना देखील देविकाने तिच्या डोळ्यातून, हावभावतून केलेला अभिनय अप्रतिम आहे. चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा खूपच चांगल्या पद्धतीने मांडल्या आहेत. जाऊ दे न वं हे गाणे ऐकायला मस्त वाटते.[६] सुधाकर यांची दिगदर्शन करण्याची पहिली वेळ आहे असे चित्रपट पाहताना कुठेच जाणवत नाही. केवळ काही दृश्य चित्रपटात पुन्हा पुन्हा येत असल्याचे जाणवते. तसेच चित्रपट सुरुवातीला आणि शेवटाला जाताना थोडा संथ होतो. चित्रपटाचे संवाद देखील चांगले आहेत. चित्रपटाच्या शेवटी दिग्दर्शकाने सगळ्या गोष्टी संपूर्णपणे उलगडून न सांगता कोणत्याही संवादाशिवाय चित्रपटाचा आशय लोकांपर्यंत पोहोचवला आहे.[७] यासाठी दिग्दर्शकाचे करावे तितके कौतुक कमी आहे. हा शेवट मनाला नक्कीच भिडतो. प्रेक्षकांशी असलेली नाळ तुटणार नाही, याची खबरदारी निर्माता-लेखक-दिग्दर्शकाने घेतली आहे.[८]
कलाकार
- श्रीनिवास पोकळे - चैतन्य भोसले उर्फ "चैत्या" च्या भूमिकेत
- संकेत इटनकर - बच्चनच्या भूमिकेत
- नागराज मंजुळे - चैत्याच्या वडिलांच्या भूमिकेत
- देविका दफ्तरदार - सुमी (चैत्याची आई) च्या भूमिकेत
- सेवा चव्हाण - चैत्याच्या आजीच्या भूमिकेत
- मैथिली ठाकरे - छकुलीच्या भूमिकेत
- दीप्ती देवी - पार्वतीच्या भूमिकेत (चैत्याची खरी आई)
- गणेश देशमुख - गज्याच्या भूमिकेत (बैलगाडीचा मालक)
- ओम भुतकर - हे चैत्याचे मामा म्हणून
- तक्षशिला वाघदरे - बच्चनच्या आईच्या भूमिकेत
- मीनाक्षी राठोड - छकुलीच्या आईच्या भूमिकेत
चित्रपटाची ठळक मुद्दे
प्रेक्षकांशी 'नाळ' जोडणारा चित्रपट
नाळ ही अगदी रोजच्या जगण्यातील गोष्ट आहे, त्याचा बाज ग्रामीण आहे, त्यातलं भावविश्वही गावातलं आहे.
नाळ या चित्रपटाचे लोकेशन आणि सिनेमॅटोग्राफी अप्रतिम आहे.[९]
श्रीनिवास, देविका, नागराज या सगळयांनी आपल्या भूमिका चोखपणे पार पाडल्या आहेत.
श्रीनिवासच्या चेहऱ्यावरील निरागस भाव तर प्रेक्षकांचे मन जिंकतात.
सुधाकर यांची दिगदर्शन करण्याची पहिली वेळ आहे असे चित्रपट पाहताना कुठेच जाणवत नाही.
प्रेक्षकांशी असलेली नाळ तुटणार नाही, याची खबरदारी निर्माता-लेखक-दिग्दर्शकाने घेतली आहे.[१०]
बाह्य दुवे
- https://www.lokmat.com/topics/naal-movie/
- https://www.loksatta.com/manoranjan-news/nagraj-manjule-producing-his-first-marathi-movie-naal-1768991/
- https://pudhari.news/news/Soneri/Nagraj-Popatrao-Manjule-film-Naal-Teaser-released/ Archived 2019-11-12 at the Wayback Machine.
- https://www.thelallantop.com/jhamajham/review-of-marathi-movie-naal-directed-by-sudhakar-reddy-yakkanti-and-produced-by-nagraj-manjule/
संदर्भ
- ^ चिटणीस, प्राजक्ता. "Naal Marathi Movie Review : प्रेक्षकांशी 'नाळ' जोडणारा चित्रपट". Lokmat. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.
- ^ पाठकजी, जयदीप. "नाळ-सिनेरिव्ह्यूव्यू". https://maharashtratimes.indiatimes.com. 2019-11-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले. External link in
|काम=
(सहाय्य) - ^ पाठकजी, जयदीप. "नाळ-सिनेरिव्ह्यूव्यू". https://maharashtratimes.indiatimes.com. 2019-11-12 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले. External link in
|काम=
(सहाय्य) - ^ चिटणीस, प्राजक्ता. "Naal Marathi Movie Review : प्रेक्षकांशी 'नाळ' जोडणारा चित्रपट". Lokmat. 12 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.

(सहाय्य)