नारायणन राघवन पिल्लई
Indian civil servant | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | जुलै २४, इ.स. १८९८ तिरुवनंतपुरम जिल्हा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मार्च ३१, इ.स. १९९२ | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय |
| ||
नियोक्ता | |||
पद |
| ||
अपत्य |
| ||
पुरस्कार |
| ||
| |||
सर नारायणन राघवन पिल्लै[१] (२४ जुलै १८९८ - ३१ मार्च १९९२) हे भारतीय नागरी सेवक होते जे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे दुसरे महासचिव होते,[२] तसेच स्वतंत्र भारतातील पहिले कॅबिनेट सचिव. हे पद त्यांनी ६ फेब्रुवारी १९५० ते १३ मे १९५३ पर्यंत भूषवले होते. [३] त्यांनी फ्रान्समध्ये भारताचे राजदूत म्हणूनही पण काम केले.
वैयक्तिक जीवन
१९२८ मध्ये त्यांनी लग्न केले आणि या जोडप्याला दोन मुले झाली. निशा पिल्लई, माजी बीबीसी प्रस्तुतकर्ता, त्यांच्या नातवंडांपैकी एक आहे. [४]
सन्मान
१९३७ मध्ये त्यांची कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (CBE) म्हणून नियुक्ती करण्यात आली, [५] १९३९ मध्ये कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर (CIE) [६] आणि १९४६ मध्ये नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर ( KCIE) सन्मानात केले.[७]
पिल्लई यांना १९६० मध्ये भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते आणि १९७० मध्ये ट्रिनिटी हॉल या त्यांच्या जुन्या महाविद्यालयाचे मानद फेलो बनले होते.
संदर्भ
- ^ Dewan Nanoo Pillai by K. R. Elenkath, Trivandrum, 1982 see chapter titles family members
- ^ List of Persons, Foreign Relations of the United States, 1955–1957, South Asia, Volume VIII, retrieved 8 February 2022.
- ^ Kapur, Harish (2009). Foreign Policies of India's Prime Ministers. Delhi: Lancer Publishers. p. 444. ISBN 9780979617485.
- ^ Pillai, Nisha. "Tandoored Legs". Outlook Magazine. 10 October 2012 रोजी पाहिले.
- ^ "Supplement to the London Gazette, 29 January 1937". HMSO. 13 October 2012 रोजी पाहिले.
- ^ "Supplement to the London Gazette, 6 June 1939". HMSO. 13 October 2012 रोजी पाहिले.
- ^ "Supplement to the London Gazette, 4 June 1946". HMSO. 13 October 2012 रोजी पाहिले.