नारायण सदोबा काजरोळकर
नारायण सदोबा काजरोळकर | |
---|---|
मृत्यू | १९८३ |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | सामाजिक कार्यकर्ते भारतीय स्वातंत्र्य सैनिक |
धर्म | चांभार[१] |
पुरस्कार | पद्मभूषण |
नारायण सदोबा काजरोळकर (?? - इ.स. १९८३) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून पहिल्या लोकसभेत, तिसऱ्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातून आणि चौथ्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. [२][३]
त्यांनी १९५२ च्या पहिल्या लोकसभेसाठीच्या निवडणुकीत बाबासाहेब आंबेडकर यांचा १५,००० मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीआधी काजरोळकर आंबेडकरांचे स्वीय सहाय्यक होते.[४] १९६२ च्या निवडणुकीत ते त्याच मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आले..[५]
काजरोळकर यांचा जन्म अनुसूचित जाती जमातीमध्ये झाला होता. अनुसूचित जाती समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे व्यक्ती म्हणून त्यांना १९५३ च्या पहिल्या मागासवर्ग आयोगाचे सदस्य नेमल्या गेले.[१][६] मागासवर्गीय लोकांची संघटना असलेल्या दलित वर्ग संघाचे ते सदस्य होते आणि त्यांनी ५ एप्रिल १९५३ रोजी जगजीवन राम यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले तेव्हा त्यांनी समितीचे सचिव म्हणून काम केले.[७] समाजातील त्यांच्या योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना १९७० मध्ये पद्मभूषण हा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला.[८]
इस १९८३ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.[९]
हे सुद्धा पाहा
- महाराष्ट्राचे खासदार
- उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ
संदर्भ
- ^ a b Christophe Jaffrelot (2003). India's Silent Revolution: The Rise of the Lower Castes in North India. C. Hurst & Co. Publishers. p. 505. ISBN 9781850656708.
- ^ "The first Lok Sabha elections (1951–52)". Indian Express. 27 March 2014. 26 March 2016 रोजी पाहिले.
- ^ Akshaya Mukul (2015). Gita Press and the Making of Hindu India. HarperCollins Publishers India. p. 552. ISBN 9789351772316.
- ^ "B. R. Ambedkar". Times of Maharashtra. 14 November 2014. 2016-04-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 March 2016 रोजी पाहिले.
- ^ "Members of the Third Lok Sabha". Empowering India. 2016. 2021-10-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 26 March 2016 रोजी पाहिले.
- ^ Sankar Ghose (1993). Jawaharlal Nehru, a Biography. Allied Publishers. p. 353. ISBN 9788170233695.
- ^ Indrani Jagjivan Ram (2010). Milestones: A Memoir. Penguin Books India. p. 297. ISBN 9780670081875.
- ^ "Padma Awards" (PDF). Ministry of Home Affairs, Government of India. 2016. 2015-10-15 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 3 January 2016 रोजी पाहिले.
- ^ Lok Sabha, India. Parliament (2003). "Indian Parliamentary Companion: Who's who of Members of Lok Sabha".