नारायण विष्णुशास्त्री बापट
नारायण विष्णूशास्त्री बापट (जन्म : १८३२; - १८९७) हे एक भाषांतरकार आणि निबंधलेखक होते. त्यांनी इतिहासाच्या काही पुस्तकांचे भाषांतर केले आहे. त्यांचा संस्कृतचा गाढा व्यासंग होता. नारायणरावांनी मुंबईच्या सेंट्रल बुक डेपोचे क्यूरेटर म्हणून काही वर्षे काम केले आणि पुढे ते बेळगावला शिक्षण निरीक्षक म्हणून रुजू झाले.
नीतिदर्पणकर्ते विष्णूशास्त्री बापूशास्त्री बापट हे नारायणरावांचे वडील.
नारायण विष्णूशास्त्री बापट यांनी लिहिलेली पुस्तके
- दख्खनचा प्राचीन इतिहास (१८८७) : हे डॉ. रा.गो. भांडारकर यांच्या ’द अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन’चे मराठी भाषांतर होते.
- नवशिक्यांकरिता इंग्लंडचा इतिहास (१९९२) : हे मिस आराबेला बर्कले यांच्या ग्रंथाचे भाषांतर.
- उन्नती म्हणजे काय आणि तिची आवश्यकता (निबंध, १८८७)
- संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन (१८८८) : ३ऱ्या शतकापासून झालेल्या संस्कृत विद्येचा विकास