Jump to content

नारायण लक्ष्मण सोनवडेकर

नारायण लक्ष्मण सोनवडेकर (२१ जानेवारी, इ.स. १९३३-९ एप्रिल, इ.स. २००२) हे स्मारकशिल्पे, व्यक्तिशिल्पे घडविणारे नामवंत शिल्पकार होते. १९७१ साली कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंदांचा १० फुट उंचीचा भव्य पूर्णाकृती ब्रॉंझचा पुतळा सोनवडेकरांनी घडविला.

वैशिष्ट्यपूर्ण शिल्पाकृती

  • महात्मा गांधींचा पुतळा (उंची ९ फुट-२·७४ मी.), महाराष्ट्र विधानभवन, नागपूर.
  • सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा ब्रॉंझचा अर्धपुतळा (३ फुट-०·९१ मी.), शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया.
  • छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्रॉंझचा अश्वारूढ पुतळा (उंची १३ फुट-३·९६ मी.), फर्मागुडी, गोवा.
  • महात्मा जोतीबा फुले यांचा ब्रॉंझ पुतळा (२० फुट-६·०९ मी.), महाराष्ट्र विधानभवन, मुंबई