नारायण मुरलीधर गुप्ते
नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ कवी बी (जून १, १८७२ - ऑगस्ट ३०, १९४७) हे मराठी कवी होते.
त्यांनी सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच त्यांनी काही भाषांतरेही केली आहेत. कवी बी यांच्या वडिलांचे नाव मुरलीधर बाजीराव गुप्ते तर आईचे नाव लक्ष्मीबाई उर्फ अन्नपूर्णाबाई मुरलीधर गुप्ते होते. संत गजानन महाराज गुप्ते हे त्यांचे लहान भाऊ होते. त्यांची पहिली कविता 'प्रणय पत्रिका' १८९१ साली 'करमणूक' मध्ये छापून आली होती. त्यांच्या प्रसिद्धीपराङ्मुख स्वभावामुळे 'कवी बी' कोण हे लोकांना अनेक वर्षे माहिती नव्हते.[१]
'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना आचार्य अत्र्यांची आहे. पिकले पान हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह. त्यात ११ कविता होत्या. कवी बी यांनी एकून ४९ कविता लिहिल्या. फुलांची ओंजळची दुसरी आवृत्ती सप्टेंबर १९४७ मध्ये प्रसिद्ध झाली. पण ती प्रसिद्ध झालेली पाहण्याचे भाग्य बी यांना लाभले नाही. ३० ऑगस्ट १९४७ रोजी त्यांचे निधन झाले.
प्रकाशित काव्यसंग्रह
- पिकले पान
- फुलांची ओंजळ (१९३४)
प्रसिद्ध कविता
- चाफा (चाफा बोलेना, चाफा चालेना..)
- माझी कन्या (गायी पाण्यावर काय म्हणूनी आल्या...)
- दीपज्योतीस
- बंडवाला
- कविवंदन
संदर्भ
- ^ "निरंजन घाटे, लोकसत्ता, ३० ऑगस्ट, २००६". 2006-11-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-10-10 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
- 'कवी बी' यांच्या कविता विदागारातील आवृत्ती