नारायण भवानराव पावगी
नारायण भवानराव पावगी (२५ फेब्रुवारी, इ.स. १८५४ - ८ डिसेंबर, इ.स. १९३५) हे ११ खंडांत 'भारतीय साम्राज्य' हा इतिहासग्रंथ लिहिणारे इतिहासकार होते. 'भाषाशास्त्र' आणि 'भारतीय नाटकशास्त्र' हे अन्य ग्रंथही त्यांनी लिहिले.
प्रकाशित पुस्तके
- भाषाशास्त्र (इ.स. १९०१)
- भारतीय नाटकशास्त्र व नाट्यकला आणि पाश्चात्य रंगभूमि (इ.स. १९०२)
- आर्यावर्तच आर्यांची जन्मभूमि व उत्तर ध्रुवाकडील त्यांच्या वसाहती (इ.स. १९२०)
- ॠग्वेदातील सप्तसिंधुंचा प्रांत अथवा आर्यावर्तातील आर्यांची जन्मभूमि आणि उत्तर ध्रुवाकडील त्यांच्या वसाहती (इ.स. १९२१)
- सोमरस-सुरा नव्हे (इ.स. १९२२)
- आत्मवृत्त (इ.स. १९२४)