नारायण ज्ञानदेव पाटील
नारायण ज्ञानदेव पाटील (१५ जुलै १९२९- १७ जानेवारी २०२२) हे महाराष्ट्रातील राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते. एन. डी. पाटील या नावाने ते ओळखले जातात. शेतकरी कामगार पक्षाचे ते नेते होते.[१]
आपाटील यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व रयत शिक्षण संस्थेमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांचे काम पाहिले होते. ते महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे १८ वर्षे सदस्य होते. १९७८ ते १९८० या काळात ते राज्याचे सहकार मंत्री होते.[२] ते १९८५-९० दरम्यान महाराष्ट्र विधानसभेत कोल्हापूरचे आमदार होते. तसेच १९९९-२००२ या काळात त्यांनी लोकशाही आघाडी सरकारचे निमंत्रक म्हणून काम केले.[३]
१७ जानेवारी २०२२ रोजी कोल्हापूरात वयाच्या ९३ व्या वर्षी वृद्धापकळाने त्यांचे निधन झाले.[१]
संदर्भ
- ^ a b "'शेकाप'चे ज्येष्ठ नेते एन.डी.पाटील यांचं निधन". Loksatta. 2022-01-17 रोजी पाहिले.
- ^ "सर्वसामान्यांचा आवाज हरपला! ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांचं निधन". Maharashtra Times. 2022-01-17 रोजी पाहिले.
- ^ "एन. डी. पाटील यांचं निधन, 'या' 3 इच्छा अपूर्णच राहिल्या". BBC News मराठी. 2022-01-17. 2022-01-17 रोजी पाहिले.