Jump to content

नाना महाराज तराणेकर

नाना महाराज तराणेकर

मूळ नावमार्तण्ड शंकर तराणेकर
जन्म१८ ऑगस्ट १८९६
तराणा मध्यप्रदेश
निर्वाण१६ एप्रिल १९९३
नागपूर महाराष्ट्र
उपास्यदैवतभगवान दत्तात्रेय
गुरूवासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) महाराज

मार्तण्ड शंकर तराणेकर उपाख्य नाना महाराज तराणेकर ( १८ ऑगस्ट १८९६, तराणा, मध्यप्रदेश - मृत्यू: १६ एप्रिल १९९३, नागपूर, महाराष्ट्र) हे दत्त संप्रदायातील एक संत होते.[] नाना महाराज हे वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) महाराज यांच्या अनुग्रहित शिष्यांपैकी एक होते.[]

जन्म आणि बालपण

मध्यप्रदेशांतील उज्जैन जवळील "तराणा" या गावी नाना महाराजांचा जन्म शंकरशास्त्री आणि लक्ष्मीबाई याच्या पोटी झाला. शंकर शास्त्री याना वासुदेवानंद सरस्वती यांचा अनुग्रह प्राप्त झालेला असल्याने भक्ती मार्गाची परंपरा नानाच्या घराण्यात पिढीजातच  होती.[]

कार्य

नानांनी आपले जीवन समाज हितासाठी दिले होते, नाना नामस्मरणाचे महत्त्व आपल्या शिष्यांना समजावून देणे, जीवनात आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी सतत मदतीचा हात देणे आणि अडचणीच्या वेळी योग्य मार्ग दाखविणे, यामुळे नानांचा शिष्यपरिवार विस्तारला आणि या साऱ्या शिष्याना एकत्रित आणण्यासाठी नानांनी त्रिपदी परिवाराची स्थापना केली.[][]

नानांनी आपल्या शिष्यांच्या पात्रतेनुसार मार्गदर्शन केले. त्यांनी अापल्या शिष्यांना भक्तिमार्ग, योगमार्ग, ज्ञानमार्ग अशा विविध पद्धतींनी दीक्षा दिल्याची उदाहरणे आहेत. नानांनी करुणात्रिपदी जनमानसात पोहचविण्याचे कार्य केले.[]


संदर्भ

  1. ^ जुवेकर, रोहन. "`नाना' महाराजांचे दत्त संप्रदायातील योगदान | Saamana (सामना)". www.saamana.com (इंग्रजी भाषेत). 2017-10-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-05-12 रोजी पाहिले.
  2. ^ "Shishya Parivar". http://www.shrivasudevanandsaraswati.com (इंग्रजी भाषेत). 2018-05-1२ रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)
  3. ^ a b "श्री नानामहाराज तराणेकर (सन १८९६-१९९३) | श्री दत्त महाराज". dattamaharaj.com (इंग्रजी भाषेत). 2018-05-12 रोजी पाहिले.
  4. ^ "About Tripadi Parivar". nanadham.com (इंग्रजी भाषेत). 2017-02-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-03-31 रोजी पाहिले.
  5. ^ वेबदुनिया. "About Nana Maharaj Taranekar | त्रिपदीचे अध्वर्यु- नानामहाराज तराणेकर" (इंग्रजी भाषेत). 2018-05-12 रोजी पाहिले.