Jump to content

नाना पाटेकर

नाना पाटेकर
जन्मविश्वनाथ दिनकरराव पाटेकर
१ जानेवारी, १९५१ (1951-01-01) (वय: ७३)
मुरुड-जंजिरा, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्र अभिनय (चित्रपट, नाटके)
कारकीर्दीचा काळइ.स. १९७८ - चालू
भाषामराठी, हिंदी
प्रमुख नाटके पुरुष
प्रमुख चित्रपट मराठी: पक पक पका‌क्‌
हिंदी: प्रहार, अब तक छप्पन (हिंदी चित्रपट)
वडील दिनकर पाटेकर
आई संजना पाटेकर
पत्नीनीलकांती पाटेकर
अपत्ये मल्हार पाटेकर

विश्वनाथ दिनकरराव पाटेकर उर्फ नाना पाटेकर (१ जानेवारी, १९५१; मुरुड-जंजिरा - हयात) हे एक मराठी अभिनेते आहेत. त्यांनी अनेक हिंदीमराठी चित्रपटांत व नाटकांत भूमिका केल्या आहेत. पाटेकरांनी नायक, सहनायक, खलनायक आणि चरित्रनायक अशा विविध भूमिका केल्या आहेत. नानांचा मराठीत नटसम्राट हा सिनेमा विशेष गाजला आहे.[ संदर्भ हवा ]

नाना पाटेकर हा आयुष्यात प्रचंड खस्ता खाल्लेला त्या धडपडीतून सावरून शिकून उभा राहिलेला असा एक अभिनेता आहे. जगाची व जगण्याची जाण असलेला हा एक उत्तम नट नव्हे तर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीचा नटसम्राट आहे.[ संदर्भ हवा ]

ओळख

नाना पाटेकर यांचा जन्म जानेवारी १, इ.स. १९५१ रोजी मुरुड-जंजिरा, महाराष्ट्र येथे झाला.[ संदर्भ हवा ] नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी आहेत. नानांना स्केचेस बनवण्याचा शौक होता. गुन्हेगारांच्या वर्णनावरून नानांनी त्यांची रेखाचित्रे करून दिली आहेत. या कलाशिक्षणाच्या काळात नाना कॉलेजच्या नाटकांत कामे करू लागले.[ संदर्भ हवा ] अतिशय गरीब परिस्थिती

कारकीर्द

नाना पाटेकर यांनी ’गमन’ इ.स. १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले गिद्ध, भालू, शीला या त्या काळातल्या दुय्यम दर्जाच्या चित्रपटांत नाना होते. यांपैकी एकही चित्रपट खूप कमाई करू शकला नाही.[ संदर्भ हवा ]

राज बब्बर यांची प्रमुख भूमिका असलेल्या ’आज की आवाज’ चित्रपटात नाना सहनायक होते. त्यांचे काम वाखाणले गेले, पण चित्रपट पडला.[ संदर्भ हवा ]

नानाची पहिली यशस्वी भूमिका एन.चंद्रा यांची पहिली-वहिली निर्मिती व दिग्दर्शन असलेला अंकुश हा चित्रपट. १९८६ मध्ये आलेल्या या चित्रपटात नानांनी एका सरळमार्गी पण बेकारीमुळे त्रस्त असलेल्या युवकाची भूमिका केली होती. नानांची ही भूमिका अविस्मरणीय ठरली.[ संदर्भ हवा ]

१९८७ मध्ये आलेल्या एन.चंद्रा यांच्या ’प्रतिघात’मधील नानांची छोटी भूमिका लोकांना आवडली. सुजाता मेहता या चित्रपटाची नायिका होती.[ संदर्भ हवा ]

१९८९मध्ये आलेल्या परिंदा चित्रपटात नानांची खलनायकाची भूमिका अफाट गाजली. १९९२मध्ये तिरंगा या चित्रपटाद्वारे नाना पाटेकरांना प्रमुख भूमिका करावयाचा पहिल्यांदा मान मिळाला. आपल्या संवादफेकीमुळे नाना पाटेकर यांनी संवाद शैलीकरिता प्रसिद्ध असलेल्या त्या चित्रपटातील राजकुमार यांच्या तोडीस तोड अभिनय केला.[ संदर्भ हवा ]

२०१४ मधील 'प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटाने त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली.[ संदर्भ हवा ]

नाटके आणि त्यांतील भूमिका[ संदर्भ हवा ]

  • पुरुष (गुलाबराव)
  • हमीदाबाईची कोठी (सत्तार)

चित्रपट [ संदर्भ हवा ]

क्रमांक वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा पात्राचे नाव अधिक माहिती
१९८६अंकुश
१९८६माफीचा साक्षीदार
१९९२अंगार
१९९६अग्निसाक्षी
१९८७अंधा युद्ध
२००५अपहरणतबरेज आलम
२००५अब तक छप्पनइन्स्पेक्टर साधू आगाशे
अभय
१९८७अवाम
२००३ऑंच
१९८४आज की आवाज
२००९इट्स माय लाइफ
१९९९कोहराम : द एक्सप्लोजन
१९९४क्रांतिवीर
१९९६खामोशी : द म्यूझिकल
२०००गैंग
१९७८गमनवासू
१९८४गिद्ध : द व्हल्चर
१९९७गु़लाम-ए-मुस्तफ़ा
२००६टैक्सी नम्बर ९२११
२००३डरना मना है
२०००तरकीब
१९९२तिरंगा
१९८८त्रिशाग्नी
१९९०थोडसा रूमानी हो जाएॅं
द अटॅक ऑफ २६/११
१९८६दहलीज़
१९९०दिशा
१९९१दीक्षा
२०११देऊळमराठी
२०१५नटसम्राटमराठी
२००५पक पक पकाकमराठी
१९८९परिंदासर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता, फिल्मफेर पुरस्कार
२०१४डॉ. प्रकाश बाबा आमटेमराठी
१९८७प्रतिघात
१९९१प्रहार : द फायनल अटॅक
२००५ब्लफ़ मास्टर
भालू
२००३भूत
१९८७मोहरे
१९९७यशवंतयशवंत
१९९८युगपुरुष: अ मॅन हू कम्स जस्ट वन्स इन् अ वे
राजनीति
१९९२राजू बन गया जंटलमन
१९९८वजूद
२००२वध
२००७वेलकम
वेलकम बॅक
२००२शक्ति : द पॉवर
शेला
१९८८सलाम बॉम्बे
१९८८सागर संगम
१९८७सूत्रधार
२००७हॅटट्रिक
१९९५हम दोनों
१९९९हुतूतू
२०१६नटसम्राट

पुरस्कार [ संदर्भ हवा ]

वर्ष (इ.स.)पुरस्कारभूमिकाचित्रपट
१९९०फिल्मफेर पुरस्कारसर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेतापरिंदा
१९९२फिल्मफेर पुरस्कारसर्वोत्कृष्ट खलनायकअंगार
१९९५फिल्मफेर पुरस्कारसर्वोत्कृष्ट अभिनेताक्रांतिवीर
१९९५राष्ट्रीय पुरस्कारसर्वोत्कृष्ट अभिनेताक्रांतिवीर
१९९५स्टार स्क्रीन पुरस्कारसर्वोत्कृष्ट अभिनेताक्रांतिवीर
२००५फिल्मफेर पुरस्कारसर्वोत्कृष्ट खलनायकअपहरण
२००५स्टार स्क्रीन पुरस्कारसर्वोत्कृष्ट खलनायकअपहरण
२०१३पद्मश्री पुरस्कार[]
२०१६गोदावरी गौरव पुरस्कारचित्रपटक्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल

दिग्दर्शक

नाना पाटेकर यांनी प्रहार:द फायनल अटॅक (१९९१) हा चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा पहिला चित्रपट होय. या चित्रपटामध्ये माजी सेनाप्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी काम केले आहे.[ संदर्भ हवा ]

दिग्दर्शक म्हणून एखादे नाटक करण्याची त्यांची इच्छा आहे.[ संदर्भ हवा ]

सामाजिक कार्य

नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये अभिनेते मकरंद अनासपुरे याच्या बरोबर नाम फाउंडेशन या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना विशेष करून मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत करतात.[]

नाना पाटेकर यांच्यावरील पुस्तक[ संदर्भ हवा ]

  • तुमचा आमचा नाना (लेखसंकलक श्रीकांत गद्रे) : या प्रकाशनाधीन पुस्तकात एन. चंद्रा, ना. धों. मनोहर, सुनील गावसकर, डॉ. रवी कसबेकर, रीमा, मंगेश तेंडुलकर, मोहन आगाशे, एन. चंद्रा, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, किशारी अमोणकर, सुभाष अवचट, रवींद्र साठे, अरविंद जगताप, विश्वजित शिंदे, डॉ. विकास आमटे, सुधीर गाडगीळ आदी ३५-४० लेखकांचे नानांविषक लेख आहेत. (प्रकाशन: फेब्रुवारी २०१७)

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ गृह मंत्रालय, भारत सरकार. "Padma Awards Announced" (इंग्रजी भाषेत). ६ एप्रिल २०१४ रोजी पाहिले.
  2. ^ "बळीराजासाठी नाना-मकरंदची 'नाम' फाउंडेशन", महाराष्ट्र टाइम्स वृत्तपत्र

बाह्य दुवे

  • इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील नाना पाटेकर चे पान (इंग्लिश मजकूर)