Jump to content

नानटे

  ?नानटे

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळभाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहरदापोली
जिल्हारत्नागिरी जिल्हा
भाषामराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
• आरटीओ कोड

• एमएच/

नानटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान

दापोलीपासून १४ किलोमीटरावर नानटे गाव वसलेलं आहे.दापोली ते दाभोळ हा मुख्य रस्ता नानटेगावातूनच पुढे जातो.१४ किलोमीटरावर पसरलेल्या या गावात तुम्हाला विविध गोष्टी पाहायला मिळतील. अनुकूल वाावरण , नदी, डोंगरदऱ्या, गर्दझाडे, पक्षी, प्राणी , देवुळे, अश्या अनेक गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. नानटे हे गाव मुख्यतः पाचं वस्ती (वाड्या) मध्ये पसरलं आहे. दापोलीकडून येताना लाठीमाळ ह्या चौकोनी रस्त्यावर ऊतरल्यावर तुम्हाला नानटे माथेगुजर हा रस्ता पकडल्यावर पहिल्यांदा चिंचवाडी ही वाडी मिळते .ही वाडी या गावातील सर्वाधिक लोकसंख्येची वस्ती समजली जाते .या वाडीत गणपतीचं जागृत देवस्थान असून गणपतीचं मोठं मंदिर आहे.आणि या गणपतीवर या लोकांची श्रद्धा असल्याने दरवर्षी मोठ्या उत्साहाने इथे कार्यक्रम साजरे केले जातात.या वाडीतुन पुढे गेल्यावर कांबळेवाडी ही वाडी मिळते . चिंचवाडी आणि कांबळेवाडी या दोन्ही वाड्यांची भौगोलिक सीमा हे एकच आहे. या दोन्ही वाड्या शिमगा हा सण एकत्र साजरे करतात.

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

लोकजीवन

प्रेक्षणीय स्थळे

नागरी सुविधा

==जवळपासची गावे== या गावच्या आजुबाजूला तेरेवायगणी,माथेगुजर,चिखलगाव ई गाव आहेत.

संदर्भ

१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/